World News: गायीचं रक्त का पितात आफ्रिकन लोक? कुटुंबियांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचीही पद्धत वेगळी
World News: आफ्रिकेतील केनियामध्ये मसाई जमातीचे लोक राहतात. गायीचं रक्त पिण्याची त्यांची परंपरा बरेच वर्ष जुनी आहे.
World News: जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आढळतात. देश-राज्य यांनुसार लोकांच्या परंपरा (Tradition), राहण्याच्या पद्धती बदलतात. जगातील कानाकोपऱ्यात खाण्यापिण्याच्या सवयींपासून वेगवेगळ्या रितीभाती पहायला मिळतात. तसेच प्रत्येक व्यक्ती आपले शरीर सुदृढ आणि निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी विविध मार्ग अवलंबतात. आफ्रिकेतील लोकही निरोगी आरोग्यासाठी अशाच काही प्रथा अवलंबतात.
आफ्रिकेच्या (Africa) एका भागात मसाई जमातीचे (Masai Tribe) लोक राहतात. ही एक प्रकारची आदिवासी जमात आहे, जी सामान्य लोकांच्या संपर्कात तर आहे, परंतु तरीही ते वेगळे दिसतात. लांबूनच तुम्ही त्यांना ओळखू शकता. हे लोक लाल रंगाचे कपडे (Red Colour Dress) परिधान करतात, ज्याला त्यांच्या भाषेत 'सुका' म्हटलं जातं. हे कपडे त्यांची ओळख आहे. हे लोक हळूहळू आधुनिकतेकडे वळत असले तरीही आजही त्यांच्या जुन्या परंपरांवर अडून आहेत. याच परंपरांबद्दल अधिक जाणून घेऊया.
गायीचं रक्त का पिते ही आफ्रिकन जमात?
मसाई जमातीचे लोक आफ्रिकेतील केनिया (Kenya) भागात राहतात. तुम्ही त्यांच्या भागात गेल्यावर तुम्हाला ते दुरुनच त्यांच्या लाल कपड्यातील वेशात दिसून येतील. गाईचं रक्त (Cow Blood) पिण्याची त्यांची परंपरा सध्याची नसून, ती शतकानुशतकं जुनी आहे.
आफ्रिकन जमातीच्या परंपरेनुसार, हे रक्त त्यांचं सर्व प्रकारच्या रोगांपासून संरक्षण करते आणि त्यांना सर्व प्रकारच्या नशेपासून दूर ठेवते. विशेष म्हणजे हे लोक गायीचं रक्त पिण्यासाठी गायीला मारत नाहीत. तर हे लोक गाईच्या अंगाला छोटं छिद्र पाडून त्यातून रक्त काढतात आणि हे रक्त पिण्याची परंपरा पाळतात.
कुटुंबियांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचीही पद्धत वेगळी
विविध धर्मांतील लोकांमध्ये अंत्यसंस्कार करण्याच्या विविध परंपरा आहेत. अंत्य संस्कारादरम्यान लोक मृतदेहाला एकतर जाळतात किंवा जमिनीखाली गाडून टाकतात. पण मसाई जमातीचे लोक असं काहीही करत नाहीत. त्यांची मान्यता आहे की, मृतदेह जमिनीखली गाडल्यास माती दूषित होते.
यामुळेच त्यांच्या समाजातील एखाद्याचा मृत्यू झाला की, त्या व्यक्तीचा मृतदेह प्राण्यांची भूक भागवण्यासाठी जंगलात असाच टाकला जातो. मसाई लोक ही परंपरा शतकानुशतके पाळत आहेत आणि आजही ते त्याच परंपरेने आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंतिम संस्कार करत आहेत.
हेही वाचा: