Viral Video : वादळात झालेल्या नुकसानात मुलाला मिळाली चक्क 35 लाखांची कार? पाहा हा व्हिडीओ
Viral Video : टेक्सासमध्ये नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामध्ये एका मुलाची कार उलटल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral Video : अमेरिकेतील टेक्सासमध्ये नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे मोठा विध्वंस झाला आहे. ज्यामध्ये एका मुलाची कार उलटल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शेवरलेट कंपनीने मुलाला नवीन कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या चक्रीवादळात रिले लिओन नावाच्या 16 वर्षांच्या मुलाची कार वादळात उलटली. त्यानंतर ती पुन्हा सरळ झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये, त्या घटनेनंतरही लिओन कार चालवताना दिसत आहे, परंतु ती कार पूर्णपणे बिघडली आहे.
पाहा हा व्हिडीओ :
डॅलस न्यूज स्टेशन केएक्सएएसशी बोलताना लिओनने सांगितले की, या घटनेनंतरही कार सुरू होते. पण ती नीट चालत नाही. यानंतर शेवरलेट कंपनीने फेसबुक पोस्ट करून निवेदन जारी केले आहे. ब्रूस लोरी शेवरलेट कार डीलरशिपद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की, कंपनी Red 2022 Silverado 1500 LT ऑल स्टार एडिशन कार गिफ्ट केली आहे.
अमेरिकेत याची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे. लिओन सुरक्षित असल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असा संदेश कंपनीने लिहिला आहे. अशा भीषण परिस्थितीतही त्याने जबरदस्त ड्रायव्हिंग केले. यानंतर लिओनला कंपनीकडून ही कार आम्ही गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, त्याला सुमारे 11 लाख 45 हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे. ज्यामुळे चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची त्याची भरपाई होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
- Trending : रेस्टॉरंटमधील शिल्लक जेवण डब्ब्यात केलं पॅक; नेटकऱ्यांनी केलं पठ्ठ्याचं कौतुक
- Viral video : प्राण्यांमध्ये देखील 'पुष्पा' ची क्रेझ; श्रीवल्ली गाण्यावर साँगवर हुकस्टेप करतोय गोरिला
- Viral Video : सुनेची सासूला बेदम मारहाण, एक रोटी जास्त खाल्ल्याचा राग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
