Optical Illusion: 'या' चित्रात एक बिबट्या बसला आहे, पाहा तुम्हाला सापडतोय का?
Trending News: सध्या सोशल मीडियालर एक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होत आहे. या चित्रात एक बिबट्या बसलेल्या आहे मात्र तो चटकन दिसत नाही. तुम्हाला तो शोधून काढायचा आहे
![Optical Illusion: 'या' चित्रात एक बिबट्या बसला आहे, पाहा तुम्हाला सापडतोय का? Trending News Optical Illusion A leopard is sitting in this picture can you spot it viral on social media Optical Illusion: 'या' चित्रात एक बिबट्या बसला आहे, पाहा तुम्हाला सापडतोय का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/ca02e33d4eee6fb34b762692a563dedf167202368982189_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending News: आजकाल इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये (Illusion Image) प्राणी शोधण्याची क्रेझ दिसून येते. काही चित्रे अशी असतात ज्यात प्राणी समोर असतात पण सहज दिसत नाहीत. इंटरनेटवर विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन व्हायरल (Viral Photo) होत असतात. यात प्राण्यांची चित्रे असलेली ऑप्टिकल इल्युजन लोकप्रिय होताना दिसत आहेत. आता असेच आणखी एक ऑप्टिकल इल्युजन चित्र समोर आले आहे. या चित्रात एक बिबट्या (Leopard) बसलेला आहे. मात्र तो चटकन दिसत नाही. तुम्हाला तो शोधून काढायचा आहे.
आपल्या देशात बिबट्या जंगलात कधी कधी मानवी वस्तीत आपल्याला पाहायाला मिळतो. अनेकदा शहरात बिबट्या आल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. दरम्यान संकटात असताना माणसांपासून किंवा इतर प्राण्यांपासून वाचण्यसाठी कॅमाफ्लॉजचा (camouflage) वापर करतात. थोडक्यात फसवण्याची युक्ती वापरतात. ज्यामुळे त्यांना शोधणे कठीण जाते.
What a brilliant camouflage. How many can spot the leopard?
— Dharamveer Meena, IFS🌲 (@dharamveerifs) December 20, 2022
pc: Hemant Dabi pic.twitter.com/jwlrCwUpzJ
सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल (Photo Viral On Social Media) होत आहे. ज्यामध्ये एक बिबट्या लपला आहे. या फोटोमधील बिबट्या शोधण्याचे टास्क दिले आहे. हे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र दिसताच अनेक लोक जोपर्यंत उत्तर सापडत नाही तोपर्यत त्याकडे टक लावून पाहत राहतात. काही चित्रे अशी असतात ज्यात प्राणी समोर असतात पण सहज दिसत नाहीत. काहींना या चित्रातील बिबट्या सापडला आहे तर बिबट्या शोधताना काहींच्या डोक्याला मुंग्या आल्या आहेत.
What a brilliant camouflage. How many can spot the leopard?
— Dharamveer Meena, IFS🌲 (@dharamveerifs) December 20, 2022
pc: Hemant Dabi pic.twitter.com/jwlrCwUpzJ
हा फोटो हेमंत डाबी नावाच्या व्यक्तीने काढला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. हा फोटो आयएफएस अधिकारी धर्मवीर मीना यांनी देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक झाडाची फांजी आणि बँकग्राउंडला मातीचा ढिगारा दिसत आहे. ज्या ढिगाऱ्याजवळ एक बिबट्या देखील दिसत आहे. काही युजर्सने हा टास्क पूर्ण केला असून कमेंट करत याचे उत्तर दिले आहे,
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)