Trending News : 90 वर्षांचे आजोबा पाचव्यांदा बोहल्यावर, म्हणतात... 'लग्न हेच माझ्या दिर्घायुष्याचं रहस्य, पुन्हा निकाह करण्याची इच्छा'
90 Old Groom Fifth Marriage : एका 90 वर्षाच्या आजोबांनी पाचव्यांदा लग्न केलं असून ते हनीमूनला गेले आहेत. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Saudi Arabia Oldest Groom : सध्या सोशल मीडियावर एका 90 वर्षांच्या नवरदेवाची तुफान चर्चा आहे. 90 वर्षांच्या आजोबांना एक किंवा दोन नाही तर पाचव्यांदा लग्न केलं आहे. सौदी अरेबियामधील हे 90 वर्षीय आजोबा पाचव्यांदा बोहल्यावर चढले असून सध्या हनीमूनची मजा घेत आहेत. सौदी अरेबियामध्ये ही वृद्ध व्यक्ती त्याच्या पाचव्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे.
90 वर्षांचे आजोबा पाचव्यांदा बोहल्यावर
पाचव्यांदा लग्न केलेल्या या आजोबांचं नाव नादिर बिन दहीम असं आहे. या पाचव्या लग्नासोबतच नादिर सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव बनला आहे. आजोबा त्यांच्या पाचव्या पत्नीसोबत हनिमूनला गेले आहेत आणि भविष्यात त्यांना आणखी लग्न करायची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, नादिर बिन दहीम वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी यांनी सौदीच्या अफिफ प्रांतात पाचवा निकाह केला.
'पुन्हा निकाह करण्याची इच्छा'
सोशल मीडियावर या वृद्धाचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये लोक त्याला त्याच्या पाचव्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. व्हिडिओमध्ये म्हातारा आनंदी आहे आणि त्याच्या नवीन लग्नासाठी खूप उत्साहित दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्यांचा एक नातू म्हणतोय, 'आजोबा तुम्हाला निकाहसाठी शुभेच्छा, मी तुम्हाला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.'
90 برس کی عمر میں پانچویں شادی رچانے والے معمر ترین سعودی دلہا نے کنوارے نوجوانوں کا کیا مشورہ دیے، ویڈیو دیکھیےhttps://t.co/laYvvZpxUy pic.twitter.com/da0hb4WE3w
— العربیہ اردو (@AlArabiya_Ur) July 13, 2023
सौदीच्या सर्वात वयस्कर वराने दुबईस्थित अरेबिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल आपले मत व्यक्त केलं. या वृद्ध नवरदेवाने लग्नाचे वर्णन सुन्नत म्हणजेच इस्लाममध्ये प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलेल्या परंपरा आणि प्रथा असं केलं आहे. अविवाहितांनी लग्न करावं, असंही या व्यक्तीनं सांगितलं आहे.
'लग्न हेचमाझ्या आरोग्याचं रहस्य'
या सर्वात वृद्ध नवरदेवाने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ''या लग्नानंतर मला पुन्हा लग्न करायचं आहे. विवाहित जीवन हे सर्वात शक्तिशाली आहे, हे अल्लाहसमोर विश्वास आणि अभिमानाची गोष्ट आहे. लग्न केल्याने जीवनात शांती आणि संसारात समृद्धी येते. लग्न हे माझ्या चांगल्या आरोग्याचं रहस्य आहे. जे तरुण लग्न करण्यास घाबरतात, मी त्या तरुणांना विनंती करतो की त्यांनी धर्म वाचवण्यासाठी आणि पूर्ण आयुष्य जगण्यासाठी लग्न करावं.''
संबंधित इतर बातम्या :