(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple चा नवीन HomePod लॉन्च, जाणून घ्या यात काय आहे खास
Apple HomePod 2nd Gen : अॅपलने आपला नेक्स जनरेशन होम पॉड (HomePod ) लॉन्च केला आहे.
Apple HomePod 2nd Gen : अॅपलने (Apple) आपला नेक्स जनरेशन होम पॉड (HomePod ) लॉन्च केला आहे. मात्र कंपनीने हा HomePod लॉन्च करण्यास बराच वेळ घेतला आहे. इतके दिवस की 2021 मध्ये लोकांना वाटू लागले की Apple ने HomePod चे उत्पादन बंद केले आहे. मात्र आता नवीन HomePod 2nd Gen बाजारात दाखल झाला आहे. HomePod 2nd Gen आजपासून भारतात Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध आहे, मात्र याची शिपिंग सध्या केली जाणार नाही. 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत याची शिपिंग सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. नवीन HomePod च्या किंमतीत जुन्या मॉडेलच्या (HomePod 1st Gen) तुलनेत थोडी वाढ झाली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
- ब्रँड न्यू Apple HomePod Advanced Computational Audio, हुमिडिटी सेन्सर, रिफाइनडिझाइन आणि इतर अनेक फीचर्ससह येतो.
- विशेष म्हणजे हे 100 टक्के रिसायकल फॅब्रिकपासून बनवले जाते.
- नवीन होमपॉड S7 चिपच्या सपोर्टने सुसज्ज असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यात नवीन मल्टीकॅमेरा व्ह्यू देखील जोडण्यात आला आहे.
- अॅपलचा (Apple) नवीन स्पीकर बॅकलिट टच Surface आणि Cylindrical डिझाइनसह येतो.
- इतर फीचर्सबद्दल बोलायचे तर, तुम्ही ते 'सिरी'सह देखील वापरू शकत. इतकंच नाही, तर तुम्ही Apple Music सह 100 मिलियनहून अधिक गाणे ऐकू शकता.
होम पॉडची किंमत किती? (Apple HomePod 2nd Gen Price)
किमतीबाबत सांगितले जात आहे की, ओल्ड जनरेशनच्या (HomePod 1st Gen) तुलनेत याच्या किंमतीत थोडी वाढ झाली आहे. Apple ने भारतात आपला नवीन HomePod Rs 32,900 च्या किमतीत लॉन्च केला आहे. हा व्हाइट आणि मिडनाईट कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. भारतात ते अॅपलच्या स्टोअरमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. त्याची शिपिंग 3 फेब्रुवारीपासून सुरू केली जाऊ शकते.
अलेक्सा आणि गुगल होम मिनी
जर तुम्ही स्पीकर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Amazon च्या Alexa आणि Google च्या Home Mini चा विचार करू शकता. दोन्ही स्मार्ट स्पीकर आहेत आणि Apple च्या पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.
इतर महत्वाची बातमी: