Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
Wifi Router Security : हॅकर्सकडून वायफाय राऊटरला लक्ष्य केलं जात आहे. एका संशोधनात वायफाय राऊटरच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. काही कंपन्यांचे वायफाय राऊटर हॅकर्ससाठी सोपं लक्ष्य आहेत.
Wifi Router Security : हॅकर्सकडून वायफाय राऊटरला लक्ष्य केलं जात आहे. एका संशोधनात वायफाय राऊटरच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. काही कंपन्यांचे वायफाय राऊटर हॅकर्स (Hacker) साठी सोपं लक्ष्य बनले आहेत. यामुळे वायफाय नेटवर्कच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. आयओटी (IoT) इन्स्पेक्टर आणि चिप मॅगझिनला सुरक्षा संशोधकांच्या टीमने ही माहिती दिली आहे. यामुळे विविध कंपन्यांचे लाखो वायफाय राउटर धोक्यात आहेत. इंटरनेट सुरक्षा कंपन्यांच्या राऊटरमधील जुन्या आवृत्त्यांमधील काही घटक हे देखील याचं कारण असू शकतं. यामुळे हॅकर्सना हे राऊटर हॅक करणे सोपं होतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
'या' कंपन्यांचे लाखो वायफाय राऊटर धोक्यात
एका नवीन अहवालात असं आढळून आलं आहे की, सुमारे 226 सुरक्षा त्रुटी आढळल्यानंतर विविध ब्रँडचे लाखो वायफाय राऊटर धोक्यात येऊ शकतात. या नव्या संशोधन Netgear, Asus, Synology, D-Link, AVM, TP-Link आणि Edimax यासह मोठ्या ब्रँडमधील अनेक WiFi राऊटरच्या सुरक्षेबाबत धोक्यांची घंटा दिली आहे. IoT इन्स्पेक्टर CTO फ्लोरियन लुकोव्स्की यांनी या संशोधनाबाबत अधिक माहिती दिली की, "या तपासणीदरम्यान लहान व्यवसाय आणि होम राऊटर सुरक्षेती अयशस्वी ठरले आहेत. सर्व बग (Bug) धोकादायक नसतात. चाचणी दरम्यान, सर्व राऊटरने गंभीर सुरक्षा बग दाखवले. ज्यामुळे हॅकर्सचे काम सोपे होऊ शकते." अहवालानुसार, याचे मुख्य कारण नवीन घटकांची कमतरता असणे देखील अपेक्षित आहे, ज्यामुळे हॅकर्सना या राऊटरच्या सेवेमध्ये अडथळा आणणं सोपं होतं.
अहवालातील अधिकचे निष्कर्ष
अहवालात असंही समोर आलं आहे की,'' विक्रेते राऊटरवर साधे डीफॉल्ट पासवर्ड वापरत होते. ज्यामुळे हॅकर्सना अंदाज लावणं सोपं होतं. काही वापरकर्ते त्यांच्या डीफॉल्ट क्रेडेन्शियल्ससह राऊटर वापरण्यासाठी ओळखले जातात, ज्यामुळे ते हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य बनतात. यातील बहुतांश कंपन्या अतिशय साधे पासवर्ड वापरतात. उदाहरणार्थ, 'admin' आणि '1234' सारखे पासवर्ड इतके सामान्य आणि सोपे आहेत की हॅकर्स त्यांचा सहज अंदाज लावू शकतात. इतकेच नाही तर कंपन्या या पासवर्डचा वापर करतात, तसेच यूजर्सही हा पासवर्ड वापरतात, असंही दिसून आलं आहे.
राऊटरबाबतचे नवीन संशोधन आणि निष्कर्ष संबंधित कंपन्याना कळवण्यात आल्या. यानंतर सर्व कंपन्यांनी प्रभावित मॉडेल्ससाठी एक उपाय शोधण्यासाठी त्वरित प्रतिसाद दिला. यामध्ये Asus, D-Link, Edimax, Linksys, Netgear, Synology आणि TP-Link यांचा समावेश आहे. नवीन अपडेट लागू करण्यासाठी आणि संभाव्य हल्ले टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांच्या वायफाय राऊटरचे फर्मवेअर शक्य तितक्या लवकर अपडेट केले पाहिजे.
इतर बातम्या :
- Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर, सर्वसामान्यांना दिलासा कायम
- Omicron Variant : दिलासादायक! ओमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक नाही... 'या' देशाची माहिती
- Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला कतरिना आणि विकीच्या लग्नाचं आमंत्रण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha