Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला कतरिना आणि विकीच्या लग्नाचं आमंत्रण
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचं आमंत्रण टीम इंडियाच्या एका खेळाडूलाही पाठवण्यात आलं आहे. हा खेळाडू लग्नाला उपस्थित राहणार का हे पाहावं लागेल.
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाशी संबंधित नवनवीन अपडेट्स रोज समोर येत आहेत. हे जोडपं 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये रेशीमगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, अद्याप या जोडप्यानं अधिकृतपणे याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्या आल्यापासून ते चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्माला लग्नाचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे विरुष्का (Virushka) कतरिना आणि विकीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राजस्थान प्रशासनाकडून लग्नासंबंधित तयारी सुरु असल्याचं बोललं जातंय. राजस्थानमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी बैठकही पार पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच यासंदर्भात राजस्थानमधील अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्यामध्ये विकी आणि कॅटच्या लग्नाच्या सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा झाली होती. या दरम्यान लग्नाला फक्त 120 पाहुणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज करणार असल्याची माहिती आहे. रुढी परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असल्याची माहिती आहे. कतरिना आणि विकी शाही विवाह सोहळ्यासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीची थीम ठरवली आहे. अनेक वेडिंग प्लॅनर्सना भेटल्यानंतर या जोडप्याने थीम ठरवली आहे. मेहंदीची थीम गोल्डन, बॅगी, क्रीमी व्हाईट आणि व्हाईट असेल. त्याच वेळी, संगीताची थीम ब्लिंग म्हणून सांगितली जात आहे. कतरिना कैफच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य भारतात आले आहेत.
इतर बातम्या :
- Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding : कतरिना आणि विकीची लव्ह-स्टोरी... पहिल्या भेटीचा किस्सा
- Vicky Kaushal : फिटनेस महत्वाचा! लग्नासोबत व्यायामाकडेही लक्ष, विकी कौशलचे फोटो व्हायरल
- Dream Proposal : 'आय लव्ह यू कतरिना...', विकी कौशलने केलं कतरिनाला भन्नाट पद्धतीने प्रपोज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha