Chhaava Box Office Collection Day 38: सहावा रविवार 'छावा'नं गाजवला; सर्वांसमोर पुरून उरला, 38 व्या दिवशीही छप्पडफाड कमाई
Chhaava Box Office Collection Day 38: विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट सध्या इतिहास रचत आहे. हा चित्रपट महिन्याभरानंतरही कोट्यवधींची कमाई करत आहे. 'छावा'नं सहाव्या रविवारीही जबरदस्त कलेक्शन केलं आहे.

Chhaava Box Office Collection Day 38: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava) अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कमाल करत आहे. हा ऐतिहासिक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. पण तरीसुद्धा कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकतोय. रिलीजच्या 38व्या दिवशीही 'छावा'नं दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. 'छावा' बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
'छावा'नं 38 व्या दिवशी किती कमाई केली?
'छावा'च्या बॉक्स ऑफिसवरच्या कामगिरीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'छावा'च्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. 'छावा' आता थांबण्याच्या मनस्थितीत नसल्याचं स्पष्ट होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, 'छावा' प्रदर्शित होऊन एक महिना उलटूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. 'छावा'नं हिंदी भाषेत आधीच बरीच कमाई केली आहे, तर आता ते तेलुगू भाषेतही खूप चर्चेत आहे. चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर...
- 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 180.25 कोटी रुपये कमावले.
- तिसऱ्या आठवड्यात 'छावा'नं 84.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- चौथ्या आठवड्यात 'छावा'नं 55.95 कोटी रुपये कमावले.
- पाचव्या आठवड्यात या चित्रपटाने 33.35 कोटी रुपये कमावले.
- तर 36 व्या दिवशी 'छावा'नं 2.1 कोटी रुपये कमावले.
- 37 व्या दिवशी चित्रपटाची कमाई 3.65 कोटी रुपये होती.
- आता 'छावा' चित्रपटाच्या रिलीजच्या 38 व्या दिवशी म्हणजेच सहाव्या रविवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 38 व्या दिवशी म्हणजे सहाव्या रविवारी 4.34 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'छावा'ची 38 दिवसांत एकूण कमाई आता 583.35 कोटी रुपये झाली आहे.
'छावा'नं 38व्या दिवशी मोडले सर्वांचे रेकॉर्ड
'छावा'नं सहाव्या विकेंडला कमाल केली आहे आणि पुन्हा एकदा चित्रपटाच्या कमाईचा वेग वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 38व्या दिवशी 'छावा'नं सर्वांना धूळ चारली असून सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 'छावा' 38व्या दिवशी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे.
- 'छावा' चित्रपटानं 38 व्या दिवशी 4.34 कोटींची कमाई केली आहे.
- स्त्री 2 नं 38 व्या दिवशी 3.23 कोटी रुपये कमावले.
- उरी द सर्जिकल स्ट्राइकने 38 व्या दिवशी 3.23 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- दृश्यम 2 नं 38 व्या दिवशी 1.67 कोटी रुपये कमावले.
- पुष्पा 2 नं 38 व्या दिवशी 1.65 कोटी रुपये कमावले.
- 38 व्या दिवशी 'जवान'नं 1.51 कोटींचा व्यवसाय केला.
दरम्यान, छावा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. दरम्यान, अनेक चित्रपट आले आणि गेले पण त्यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवरून 'छावा'ला धक्का देऊ शकला नाही, पण आता सलमान खानचा 'सिकंदर' 30 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'सिकंदर' बद्दल खूप चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 'छावा'च्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. सलमान खानच्या चित्रपटासमोर विक्की कौशलचा चित्रपट कसा कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























