(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Variant : दिलासादायक! ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक नाही... 'या' देशाची माहिती
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरियंटच्या इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
Omicron Variant : जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटव्हेरियंटव्हेरियंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरियंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन इतर व्हेरियंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरियंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.
सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, व्हेरियंटवर अतिरिक्त सावधगिरीचे उपाय बाळगल्यानं त्यांना या विषाणूशी कसे लढायचे हे शिकण्यास वेळ मिळेल. सिंगापूरच्या चांगी विमानतळावर ओमायक्रॉनचे रुग्ण सापडला होते. ओमायक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीनं सिंगापूरहून मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला. ओमायक्रॉन बाधित पहिल्या रुग्णानं 27 नोव्हेंबर रोजी जोहांसबर्गहून सिंगापूर एअरलाईनच्या विमानामधून प्रवास केला होता.
ओमायक्रॉन बाधित व्यक्ती त्याच दिवशी ट्रान्झिट फ्लाईटसाठी जोहांसबर्गला पोहोचली. यानंतर, या व्यक्तीने 28 नोव्हेंबर रोजी सिंगापूर एअरलाईनच्या दुसऱ्या विमानाने सिडनीला प्रवास केला. ऑस्ट्रेलियामध्ये त्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा अहवालात समोरा आलं. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी 24 नोव्हेंबर रोजी ही व्यक्ती निगेटिव्ह आढळून आली होती. शुक्रवारपर्यंत सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची 2 लाख 67 हजर 916 बाधित आढळले असून आणि 744 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, डोंबिवलीत आढळला रुग्ण
- Hybrid Immunity : ओमायक्रॉनवर भारतीयांची हायब्रिड इम्युनिटी प्रभावी ठरेल का?
- Maharashtra Corona Update : राज्यात आज 782 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 770 रुग्ण कोरोनामुक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha