एक्स्प्लोर

Sangli News: उपचाराच्या नावाखाली मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू, सांगली कवठेमहाकांळमधील घटना

Sangli News: मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.

सांगली :  सांगली (Sangli News) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दिपक लांडगे या 14 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला  आहे. पण या मुलाचा मृत्यू हा कर्नाटकातील  एका मांत्रिकाच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 मांत्रिकाच्या मारहाणीत मुलगा  गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  उपचार करण्यासाठी दाखल केले होते. मात्र  उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनला एका नातेवाईक महिलेने तिच्या आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला. 

मांत्रिकावर कठोर कारवाई करण्याची मागणी

या घटनेचे गांभीर्य ओळखून  कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्त्यांनी  कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावांतील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास कुटुंबाची मानसिक तयारी केली. मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या कडे केली. त्यांनी तात्काळ मुलांच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेतली आहे.

 सदर गुन्हा कुडची पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असलेने हा गुन्हा कुडची पोलीस स्टेशनला वर्ग करणार असल्याचे  कवठेमहांकाळ पोलिस निरीक्षकानी  सांगितले. पण आजच्या विज्ञान युगात किरकोळ आजारासाठी मांत्रिकाकडे जाणे हे अज्ञानपणाचे लक्षण आहे.  मांत्रिकाच्या अघोरी कृत्यामुळे अशा घटना घडतात तेव्हा मांत्रिकाच्या पासून सावध रहावे असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी केले आहे. 

उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन ठोकली धूम, बीड जिल्ह्यातील घटना

 बीड जिल्ह्याच्या  केज तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीला घेऊन धूम ठाकली आहे. एका व्यक्तीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबाने त्याच कुटुंबातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आपले सूत जुळवून तिला घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर याप्रकरणी भोंदूबाबाविरुद्ध युसूफवाडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. धोंडीराम भोसले महाराज ऊर्फ माऊली (रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे या बाबाचे नाव आहे. 

हे ही वाचा :

Sangli News: गरोदरपणात ग्रहणाला डोळे भिडवले, भाज्या चिरल्या अन् फळेही कापली; त्याच दाम्पत्याला गोंडस कन्यारत्न! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
Sangli crime IND vs NZ Final T 20 World Cup: भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
Chandrakant Patil: मोठी बातमी: कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा
कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Embed widget