एक्स्प्लोर

Sangli News: गरोदरपणात ग्रहणाला डोळे भिडवले, भाज्या चिरल्या अन् फळेही कापली; त्याच दाम्पत्याला गोंडस कन्यारत्न!

गर्भवती महिलेनं ग्रहण पाहायचं नाही असा दंडकच असताना इस्लामपुरातील नवेखेडमधील पूजा ऋषीराज जाधवने सुर्यग्रहण पाहिले. तसेच इतरही जी कामे ग्रहणात केली जात नाहीत ती सुद्धा केली होती.

Sangli News: सूर्यग्रहणावरून अनेक भ्रामक कल्पना एकविसाव्या शतकात अजूनही घर करून बसल्या असतानाच याला छेद देणारी आणि त्या भ्रामक कल्पना किती पोकळ आहेत याची साक्षच देणारी सुखद घटना सांगली जिल्ह्यात घडली. गर्भवती महिलेनं ग्रहण पाहायचं नाही असा दंडकच असताना इस्लामपुरातील नवेखेडमधील पूजा ऋषीराज जाधवने सुर्यग्रहण पाहिले. तसेच इतरही जी कामे ग्रहणात केली जात नाहीत ती सुद्धा केली होती. आता त्याच पूजाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. पूजाने गरोदरपणात चौथ्या महिन्यात ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला होता. 

देशात आजही सूर्यग्रहण पाहणं हे अशुभ मानलं जातं. गरोदर महिलांना सूर्यग्रहण पाहणं दूरच, पण इतरही कामे त्यादिवशी गर्भवती महिलेला करू दिली जात नाहीत. मात्र, या प्रथा, अंधश्रद्धाना मूठमाती देण्याचे काम पूजाने केले आहे. पूजाने अंधश्रद्धांना बाजूला करत सूर्यग्रहणाशी डोळे भिडवले होते. आता पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. चार महिन्यांपूर्वी पूजाला कन्यारत्न झाले. मोठ्या दिमाखात तिचा नामकरण सोहळा पार पडला. लाडक्या लेकीचे नाव 'राजनंदनी' असं नाव ठेवलं आहे. सूर्यग्रहणाबाबत असणाऱ्या अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी पूजाचे पती आणि कुटुंबाने साथ दिली. 

गेल्यावर्षी 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण होते. त्यावेळी पूजा चार महिन्यांची गरोदर होती. तरीही पूजाने सूर्यग्रहण पाहण्याचा निश्चय केला होता. फक्त निश्चय न करता सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लूटला होता. घराच्या टेरेसवर पूजाने आपल्या पतीसह तसेच कुटुंबासमवेत सूर्यग्रहण पाहिले होते. सूर्यग्रहणावेळी कोणत्याही भाजी चिरणे, फळ कापणे सुद्धा कापले जात नसताना पूजाने भाज्या चिरल्या होत्या. तसेच फळेही कापली होती. त्यामुळे ग्रहणातील अंधश्रद्धांचे ग्रहण दूर करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget