Sangli Crime : लाच मागितल्यानंतर कपडे काढून RTO अधिकाऱ्यांना देणाऱ्या कडेगावमधील तरुणावर गुन्हा दाखल!
Sangli Crime : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद मांडवे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये आरटीओ अधिकाऱ्याने लाच मागितल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणाने स्वत:चे कपडे उतरवून देण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सांगली जिल्ह्यासह पोलिस दलातही खळबळ उडाली होती.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद मांडवे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 12 ऑक्टोबर रोजी कडेगावमध्ये ही घटना घडली होती. आरटीओ कॅम्पमध्ये ट्रॉली पासिंगसाठी आपल्याकडे लाच मागितल्याचा आरोप त्याने केला होता.
लाच मागितल्यानंतर प्रमोदचा पारा चांगलाच चढला. त्याने आरटीओ अधिकाऱ्यांसमोर सरळ कपडे उतरवून देण्यास सुरुवात केल्यानंतर अधिकारीही बावचळले होते. कडेगावमधील या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. प्रमोद मांडवी हे आपली गाडी पासिंग करण्यासाठी कडेगाव आरटीओ कॅम्पमध्ये गेले होते.
मात्र, यावेळी मांडवी यांना त्यांची गाडी पासिंग करण्यासाठी लाच मागणीचा प्रकार घडला. गाडीचे सर्व कागदपत्रे रीतसर असताना लाच कशासाठी द्यायची? असे म्हणत मांडवीचा पारा चढला. त्यानंतर त्याने स्वतःचे कपडे काढून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे कपडे घेण्यासाठी लागले. मांडवींच्या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच भंबेरी उडाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या