एक्स्प्लोर

Ratnagiri : राजापूरमध्ये आढळलं दुर्मिळ फुल, पांढरी शुभ्र 'चोहोळा' प्रजातीची फुलं नष्ट होण्याच्या मार्गावर, खासियत काय? जाणून घ्या

White Ginger Lily : राजापूरमध्ये (Rajapur) दुर्मिळ 'चोहोळा' प्रजातीचे फुल आढळून आले आहे. या दुर्मिळ असणाऱ्या आणि नष्ट होऊ घातलेल्या प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्याची गरज आहे.

Chohola Flower White Ginger Lily : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूरमध्ये (Rajapur) दुर्मिळ 'चोहोळा' प्रजातीचे फुल (Rare Flower) आढळून आले आहे. राजापूर हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक आणि पर्यावरणप्रेमी ए.के. मराठे (A. K, Marathe) यांना राजापूरातील रानतळे परिसरात हे फुल (Chohola Rare Flower) आढळले. मे आणि जून महिन्यातील वैशाख वणव्याने पार होरपळून निघालेल्या धरणी मातेला पर्जन्याचे वेध लागतात. जून अखेरीस झिम्माड पाऊसधारा बरसू लागतात आणि अवघी धरती हिरवा शालू लपेटून नवविवाहित सुहासिनीसारखी नटते, सजते. 

राजापूरमध्ये आढळलं दुर्मिळ फुल, 

पावसाळ्यात धरतीच्या अंगाखांद्यावर शुभ्र फेसाळ जलप्रपातांचे आणि विविधरंगी रानफुलांचे अलंकार झळकू लागतात. कोकणातील कातळसड्यांवर कापरी कमळ, दीपकाडी, तेरडा, सोनतळ यासारख्या असंख्य फुलांचे गालिचे सजू लागतात. अनेक अनामिक आणि दुर्मिळ फुलेही कुठेकुठे दिसू लागतात. अशाच एका दुर्मिळ 'चोहोळा' प्रजातीचे फुल राजापुरात आढळून आलं आहे. 

पांढऱ्या शुभ्र 'चोहोळा' प्रजातीची फुलं नष्ट होण्याच्या मार्गावर

राजापूर हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक आणि पर्यावरणप्रेमी A. K मराठे यांना राजापूरातील रानतळे परिसरात हे फुल आढळलं आणि त्यांचं कुतुहल चाळवलं. या फुलाची छायाचित्रे काढून त्यांनी कुडाळ येथील कातळसडा अभ्यासक सौ. मानसी करंगुटकर यांचे मार्गदर्शन घेतले, असता सदरचे फुल 'व्हाईट जिंजर लिली' (White Ginger Lily) कुळातील 'चोहोळा' (Chohola) या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातीचे असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 

दुर्मिळ प्रजातीच्या फुलाच्या संवर्धनाची गरज

इंटरनेटवरही या फुलाबाबत फारशी किंवा पुरेशी माहिती उपलब्ध नाही. या फुलाशी साधर्म्य असणाऱ्या मोजक्या फुलांपलिकडे काही ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याने या फुलाबाबत अधिक संशोधन होण्याची तसेच या दुर्मिळ असणाऱ्या आणि नष्ट होऊ घातलेल्या प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्याची नितांत गरज असल्याचे मत या फुलाचे शोधक मराठे यांनी व्यक्त केलं आहे.

चोहोळा फुलाची माहिती

चोहोळा फुलाला स्कॅप्ड जिंजर (Scaped Ginger)असंही म्हटलं जातं. याचं शास्त्रीय नाव Curcuma Scaposa असं आहे. हे कंदवर्गीय वनस्पतीच्या प्रकारात मोडतं. सोनटक्का सारखी मंद सुवासाची चोहोळा फुले अत्यंत आकर्षक दिसतात. शेतीचे बांध, सड्यावरील माती साठलेली जागा अशा ठिकाणी ही फुले आलेली दिसतात. ही एक दुर्मिळ वनस्पती आहे. ही वनस्पती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असल्याने तिच्या संरक्षणाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget