Pune Gold Rate: पुण्यातील आजचा सोन्या-चांदीचा दर काय? बजेटनंतर एक तोळा सोनं किती हजारांना मिळणार?
Pune Gold Rate: अर्थसंकल्पानंतर सोने चांदी स्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. बजेट जाहीर होताच 4 हजारांनी सोन्याचा दर घटल्याचं रांका ज्वेलर्सकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, बजेटनंतर सोनं खरेदी करताना ग्राहकांची चांदी झाली आहे.
पुणे: काही दिवसापुर्वी सोने-चांदीचे (Gold-Silver) दर अगदी गगनाला भिडले होते. सोनं जवळपास 75 हजारांपर्यंत सोनं पोहोचलं होतं. त्यानंतर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर सोने चांदी स्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. बजेट जाहीर होताच 4 हजारांनी सोन्याचा (Gold-Silver) दर घटल्याचं रांका ज्वेलर्सच्या फत्तेचंद रांका यांनी सांगितलं. त्यामुळे, बजेटनंतर सोनं खरेदी करताना ग्राहकांची चांदी झाली आहे.
अर्थसंकल्प होण्याआधी पुण्यातील सोन्याचे (Gold-Silver) दर हे 74300 रूपये प्रति तोळा ( 10 ग्रॅम) इतके होते. त्यानंतर ते 74100 रूपये प्रति तोळा ( 10 ग्रॅम) इतके झाले. तर अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर सोन्याचे दर हे 70000 प्रति तोळा ( 10 ग्रॅम) इतके झाले आहेत.तर चांदी आधी 92 हजारांवर होती तर अर्थसंकल्पातील घोषणेनंतर ती 86500 वर घसरली आहे, याबाबतची माहिती रांका ज्वेलर्सने दिली आहे.
पुण्यात किती आहेत सोन्याचे-चांदीचे दर?
अर्थसंकल्प होण्याआधी पुण्यातील सोन्याचे (Gold-Silver) दर हे 74300 रूपये प्रति तोळा (10 ग्रॅम) इतके होते. त्यानंतर ते 74100 रूपये प्रति तोळा ( 10 ग्रॅम) इतके झाले. तर अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर सोन्याचे दर हे 70000 प्रति तोळा (10 ग्रॅम) इतके झाले आहेत.
आज (मंगळवारी) केंद्राने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा परिणाम पुण्यासह इतरही मोठ्या शहरांमध्ये दिसून आला आहे. कारण, सोन्याच्या (Gold-Silver) दरात अवघ्या दोन तासात 3 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सोनं हा गरीब असो, वा श्रीमंत, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्याच्या दरात होणारी वाढ किंवा कपात ही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरते. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताच पुण्यात सोन्याच्या दरात 4 हजार रुपयांची कपात झाली आहे.
सितारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सोने-चांदीचे (Gold-Silver) सीमा शुल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केल्यामुळे सोन्याच्या (Gold-Silver) दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी झाली असून प्रतितोळा सोन्यामागे तब्बल 4 हजार रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमका काय बदल झाला?
सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.