एक्स्प्लोर

गुडन्यूज! सोने 2 तासांत 3 हजारांनी स्वस्त; पुण्यात ग्राहकांना लॉटरी, बजेटनंतर आनंदी-आनंद

केंद्राने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे/जळगाव : देशात गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून तब्बल 73 हजारांपर्यंत सोनं पोहोचलं आहे. त्यामुळे, यंदाच्या अर्थसंकल्पाकडे (Budget) देशाचे लक्ष लागले होते. अखेर, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयामुळे झाली आहे. जळगावच्या (Jalgaon) आणि पुण्याच्या (Pune) सराफ बाजारात याचा परिणाम दिसून आला. कारण, सोनं (Gold) खरेदीसाठी दुकाना गर्दी केलेल्या महिला व ग्राहकांना 2 तासांतच प्रति तोळा सोन्यामागे 3 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे, सोनं खरेदीसाठी आलेल्या या सर्वच ग्राहकांनी बजेटवर समाधान व्यक्त केलं आहे. बजेट जाहीर होताच 3 हजारांनी सोन्याचा दर घटल्याचं रांका ज्वेलर्सच्या फत्तेचंद रांका यांनी सांगितला. त्यामुळे, बजेटनंतर सोनं खरेदी करताना ग्राहकांची चांदी झालीय.  

केंद्राने सादर केलेल्या अर्थ संकल्पात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत दिसून आला. कारण, सोन्याच्या दरात अवघ्या दोन तासात 3 हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सोनं हा गरीब असो, वा श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनातील निगडीत घटक आहे. सौभाग्याचं लेणं म्हणून मनी मंगळपुत्र तरी प्रत्येक महिला भगिनींना करावंच लागतं. त्यात, लगीनसराईत सोनं खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या असतात. त्यामुळेच, सोन्याच्या दरात होणारी वाढ किंवा कपात ही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची ठरते. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात घोषणा करताच इकडे गावाकडेही सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची कपात झाली आहे. 

सितारमण यांनी आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. याआधी सोने-चांदीचे सीम शल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी झाली असून प्रतितोळा सोन्यामागे तब्बल 2 हजार रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमका काय बदल झाला?

सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के

प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के

अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. 

नव्या कररचनेत नवं काय? 

स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरुन 75 हजारांवर

3 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री

3 ते 7 लाख उत्पन्न - 5 टक्के आयकर

7 ते 10 लाख उत्पन्न- 10 टक्के आयकर 

10 ते 12 लाख उत्पन्न - 15 टक्के आयकर 

12 ते 15 लाख उत्पन्न - 20 टक्के आयकर

15 लाखांवर उत्पन्न - 30 टक्के आयकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget