एक्स्प्लोर

Pune Police: दारुड्यांना हटकलं म्हणून पोलिसालाच डांबून मारलं; पोलिसांनी दिला मिटवण्याचा सल्ला, आता न्याय कुठं मागायचा?

Pune Police: तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला, असे म्हणत आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली.

पुणे: पुण्यात पोलिस कर्मचारीच सुरक्षीत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोम्बींग ऑपरेशन करून घरी परत निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारुड्यांनी बेदम मारहाण करत, त्यांचा मोबाईल हिसकावला. संबंधीत पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दारुड्यांना अटक केली आहे. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर अखेर गुन्हा दाखल केला आहे.  चंद्रकांत जाधव (वय.42,रा.रामोशीवाडी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रुपेश मांजरेकर,अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या अन्य एका साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे सहकारनगर पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहेत. ते रामोशीवाडी एस.बी.रोड परिसरात ते वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. 13) मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मध्यप्राशन करताना  दिसले. ते चौघे गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि गोंधळ घालत असल्याचा जाब विचारला. त्याचा त्यांना राग दारूड्यांना आला आहे. त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलिस नाहीस, त्यामुळे तु आम्हाला शिकवू नको असे म्हणत दम भरला. त्यानंतर चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. 

ठार मारून टाक त्या पोलिसाला...

तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला, असे म्हणत आरोपींनी जाधव यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका करून घेतल्यानंतर जाधव यांनी मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. तो मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाने चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्‍याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. ते सांगत असताना, सर्व प्रकार समोरील अधिकार्‍यांना ऐकू जात होता. तरी चौघे जाधव यांना मारहाण करत होते. 

रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत ते ससून रुग्णालयात

काही वेळानंतर चतुःश्रृंगी पोलिस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत चौघे तेथून फरार झाले होते. जाधव यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यावेळी तेथील अधिकार्‍यांनी आता नको उद्या पाहू असे म्हणत वेळ मारून घेतली, जाधव यांनी माझी तक्रार तर दाखल करून घ्या साहेब असे म्हटल्यावर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या रात्री पहाटे पाच वाजेपर्यंत ते ससून रुग्णालयात होते. दुसर्‍या दिवशी परत जाधव चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील अधिकार्‍यांना भेटून कैफियत मांडली. कोर्टाचे काम असल्याचे सांगून हे अधिकारी निघून गेले. जाधव तेथेच ताटकळत उभे होते. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना त्यांना भेटवण्यात आले, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालतो, तसेच  दोन दिवसावर  तरंग कार्यक्रम आहे, उगीच भलती भानगड नको, आपले कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आरोपींना पकडून तुमच्यासमोर उभे करतो असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर तर पोलिसांची हद्दच झाली. त्यांनी आपल्या वजनदार माणसाचा वापर करत मारहाण झालेल्या जाधव यांना प्रकरण मिटवून घेण्याचा अजब सल्लाच दिला.

दाद कोणाकडं मागायची?

हे तेच वजनदार व्यक्तीमत्व आहे की, जे आपल्या प्रभावी पदाचा वापर करून पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौफेर उधळण करीत असतात. यापुर्वी देखील त्यांचे अनेक कारणाने समोर आले असताना, वरिष्ठांनी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांना आता तरी अंकुश लागणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. एका पोलिस कर्मचार्‍याला चौघेजण बेदम  मारहाण करत असतील, ते ही पोलिस असल्याचे माहिती असताना कारण काय तर रात्रीच्या वेळी रस्त्यावर गोंधळ घालत असताना हटकले म्हणून पोलिसाने तक्रार केल्यानंतर देखील आरोपींना धडा शिकवण्याचे सोडून पोलिसच जर पोलिसाला वाद मिटवून घेण्याचा सल्ला देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची काय अपेक्षा करावी हा खरा सवाल आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Anil Parab :  माझ्या चारित्र्यावर किती वेळा बोलणार, आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrashant Koratkar Dubai : प्रशांत कोरटकर दुबईत पळाला? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Prashant Koratkar Nagpur Crime: प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
धक्कादायक! प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जायला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत?
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
Embed widget