एक्स्प्लोर

रील स्टारला लाजवेल असे ड्रोन चित्रिकरण, 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनच्या दारातच बर्थडे सेलिब्रेशन; पिंपरीतील पोलिसाचा प्रताप

Pimpri Chinchwad Police Birthday : धनधांडग्यांच्या सेलिब्रेशनप्रमाणेच पिंपरीतील पोलिस आयुक्तालयातील शिपायाने स्टेशनच्या दारातच धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. त्याचे रील्स आता व्हायरल होत आहेत.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करण्याची, रात्री 12च्या ठोक्याला फटाक्यांचे बार लावण्याची अन् सेलिब्रेशनच्या नावाखाली धांगडधिंगा घालण्याची जणू प्रथाचं झाली आहे. बरं हा सगळा धिंगाणा बहुतांश वेळी पोलिसांनी नजरेस पडत नाही. हे बर्थडे सेलिब्रेशन धन दांडग्यांचे असल्याने पोलिस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत ही खबर पोहचू न देण्यासाठी हा खटाटोप सुरु असतो, हे उघड आहे. पण आता तर एका पोलीस शिपायाने हा सगळा राडा केला, तो पण थेट पोलिस स्टेशनच्या दारातचं. 

अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल असं ड्रोनद्वारे या बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरणही केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई प्रवीण पाटीलने हा प्रताप केला आहे. ज्यामुळं आख्ख्या पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. आता पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे या प्रकरणी काही कठोर कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

बुधवारचा दिवस संपताना अन् गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटीलची मित्रमंडळी सांगवी पोलिस स्टेशन समोर जमू लागली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली. मग काय बाराच्या ठोक्याला प्रवीणसह मित्र मंडळी पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं.

ड्रोनने चित्रिकरण, अफलातून व्हिडीओ एडिटिंग 

दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि सुतळी बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रील्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही असं कसं होईल. मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला. भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण अन् सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर अपलोड होऊ लागले. 

पिंपरी चिंचवड शहरात रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालून बर्थडे सेलिब्रेशन करण्याचं फॅड आहेच. पण गुरुवारी रात्री साजरा झालेला बर्थडे हा पोलिसाचा असेल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. बरं, पोलिस स्टेशनच्या दारात हे सगळं होत असताना, इतर पोलिसांचे कान अन् डोळे बंद होते का? असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. बरं या महाशयांनी हा व्हिडीओ स्टेट्सला ठेवला. त्यामुळं पोलिस वर्दीचा कसा गैरफायदा घेऊ शकतात, हे समाजासमोर आलं. 

पोलिस आयुक्त काय कारवाई करणार?

आता नेहमीप्रमाणे ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापर्यंत कोणी पोहचू दिलीच नाही. पण एबीपी माझाच्या हाती हा व्हिडीओ लागला अन् पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. हा व्हिडीओ पाहून वरिष्ठांनाही धक्का बसला. पण या व्हिडीओमुळं अख्ख्या पोलिस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला. त्यामुळं पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली. आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या पोलिस महाशयावर काय कठोर कारवाई करणार?  यानिमित्ताने रात्री बाराच्या ठोक्याला धांगडधिंगा घालत, साजरे होणारे बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा कायमस्वरूपी बंद पाडणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violance FIR | नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती, सूत्रधाराचे नाव समोर?Nagpur Crime Update | नागपूरच्या दगडफेकीमागे काश्मीर दगडफेकीचा पॅटर्न, पोलिसांचा तपास सुरुABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 : 12 Noon

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Embed widget