एक्स्प्लोर

थकीत वीज बिल भरा, महावितरण विभागाकडून ग्राहकांना संगीतातून साकडं

एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील 45 हजार ग्राहकांकडे तब्बल 64 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरण विभागाने ग्राहकांना संगितातून साकडं घालायला सुरुवात केली आहे. 

मुंबई : अवाजवी वीज बिल, त्यावरून अधिवेशनात गोंधळ, वीज तोडणीला स्थगिती अन अधिवेशन संपताच पुन्हा वीज तोडणीला सुरुवात. एकीकडे हे सगळं सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाकडून मात्र ग्राहकांना एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने विनवणी केली जातीये. चौकाचौकात उभं राहून कर्मचारी संगीत गातायेत आणि मग थकीत वीज बिल भरा अशी विनवणी ते या माध्यमातून करतायेत. ही मोहीम नागरिकांचं लक्ष वेधून घेणारी ठरतेय.

कोरोनाचा शिरकाव झाला आणि देश लॉकडाऊन झाला. कंपन्या बंद झाल्या, व्यवसाय ठप्प झाले. तरी ही अनेकांना डोळं चक्रावणारी वीज बिलं हातात पडली. आधीच लॉकडाऊनमुळं प्रत्येकाला आर्थिक चणचण जाणवत होती, त्यात महावितरण विभागाने अवाजवी बिलं दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून ग्राहकांनी महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवलं. 

विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं. एकाही ग्राहकाने बिल भरू नये असं आवाहन विरोधकांनी केलं. परिणामी वीज बिलं थकीत राहिली. म्हणूनच आजच्या तारखेला एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील 45 हजार ग्राहकांकडे तब्बल 64 कोटींची थकबाकी आहे. राज्याची ही आकडेवारी हजारो कोटीत जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकीत धारकांची वीज तोडणी करण्याचे आदेश दिले. 

सोनू तुला वीजबिल भरायचं नाय का? थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणचा अनोखा फंडा

राज्य सरकारच्या या आदेशावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. मग सरकारने तातडीनं वीज तोडणीला स्थगिती दिली. पण अधिवेशन संपलं त्याच दिवशी ही स्थगिती उठवून पुन्हा वीज तोडणीचे आदेश देण्यात आले. कोरोनामुळं राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे, तिजोरीत पुन्हा पैसा आणायचा असेल तर थकबाकी जमा करणं महत्वाचं आहे. असा दाखला देण्यात आला. 

राज्यभर पुन्हा वीज तोडणी सुरू असताना पिंपरी चिंचवडमध्ये महावितरण विभागाने संगीतातून साकडं घालायला सुरुवात केलीये. ग्राहकांनी वीज बिल का भरावं, याबाबत त्यांच्यात जनजागृती केली जातीये. शहरातील चौकाचौकात ही मोहीम राबवली जात आहे. कर्मचारी स्वतः वेगवेगळी गीत गाऊन सर्वांचं लक्ष वेधत आहेत. थकीत बिलं भरण्यासाठी शहरात वेगवेगळ्या पध्दतीने जनजागृती केली जातीये, त्याचाच हा एक भाग आहे. म्हणूनच महावितरण विभागाच्या या आगळ्या-वेगळ्या मोहिमेची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे. आता या चर्चेचं रूपांतर बिल अदा करण्यात झालं तर खऱ्या अर्थाने ही मोहीम सार्थकी लागली असं म्हणता येईल.

कनेक्शन तोडू नका असं सांगितलंय, तोडलेलं जोडा असं कुठेही म्हटलेलं नाही; महावितरण अधिकाऱ्याच्या उत्तराने शेतकरी निराश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टीका लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Embed widget