एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कनेक्शन तोडू नका असं सांगितलंय, तोडलेलं जोडा असं कुठेही म्हटलेलं नाही; महावितरण अधिकाऱ्याच्या उत्तराने शेतकरी निराश

सरकारी आदेशाची अंमलबजावणी होताना ती शब्दश: घेतल्यास काय होतं याची प्रचिती एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आली आहे. किल्लारमधील महावितरणच्या अधिकाऱ्याने दिलेलं उत्तर ऐकून शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली.

लातूर : विधिमंडळात मंत्र्यानी घेतलेला निर्णय हा शासन आदेश असतो. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना ती शब्दश: घेतल्यास काय होते याची प्रचिती एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथल्या महावितरणच्या कार्यालयात वीज पुरवठा तोडलेले शेतकरी आले होते. वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी त्यांची मागणी होती. आम्ही वीज जोडणी करु शकत नाहीत यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्याने कारण दिलं की, कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे, तोडलेले जोडा असं आदेशात कुठेही म्हटलेलं नाही. हे उत्तर ऐकून शेतकऱ्यांची निराशा झाली आणि रिकाम्या हाती ते घरी परतले.

चार दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळातील चर्चित असलेल्या वीज बिलाबाबत निर्णय होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असं जाहीर केलं. या निर्णयाची जोरदार चर्चा झाली. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. याच भोळ्या आशावादातून किल्लारी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकरी किल्लारी इथल्या महावितरणच्या कार्यलयात गेले. काही दिवसांपूर्वी आमचा वीज पुरवठा खंडित झाला आहे तो जोडून द्यावा अशी त्यांची मागणी होती. यावर अधिकारी म्हणाले की, 'कनेक्शन तोडू नका असं सांगितलं आहे. तोडलेले जोडा असे कुठे आदेशात सांगितले आहे? वीज बिलाचा निर्णय होईपर्यंत नवीन कनेक्शनही देणार नाहीत. आधीच लॉकडाऊन त्यातच या भागातील शेतकरी अतिवृष्टीमुळे पार जेरीस आला आहे. वीज बिल भरता आलं नाही. आता कुठे शेतमाल हातात पडणार आहे पण त्याला पाणी देण्यासाठी शेतात वीज नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला. मग आपला वीज पुरवठा पूर्ववत होईल ही आशा घेऊन महावितरणच्या कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्याने सरकारी भाषेतील अर्थ समजावून रिकाम्या हाती माघारी पाठवलं. मात्र शेतकऱ्यांनी काढलेला त्या आदेशाचा अर्था मागील भावना ना सत्ताधाऱ्यांना कळली ना अधिकाऱ्याला. ज्या दिवशी महावितरणच्या अधिकाऱ्याला 'बिटविन द लाईन' कळली तो दिवस शेतकऱ्याच्या जीवनात नक्कीच प्रकाश आणेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Embed widget