सावधान...! 'सिमकार्ड एक दिवसासाठी बंद', ऑनलाईन लुटीचा नवा फंडा
ऑनलाईन लूटीचा आता नवा फंडा समोर आलाय. तुमचे सिम कार्ड एक दिवसासाठी बंद केलं जातं, त्याचा ताबा ऑनलाईन लुटारू स्वतःकडे घेतो आणि तुमच्या खात्यावर बँकेकडून पर्सनल लोन घेतो.
पिंपरी- चिंचवड : ऑनलाईन लूटीचा आता नवा फंडा समोर आलाय. तुमचे सिम कार्ड एक दिवसासाठी बंद केलं जातं, त्याचा ताबा ऑनलाईन लुटारू स्वतःकडे घेतो आणि तुमच्या खात्यावर बँकेकडून पर्सनल लोन घेतो. ती रक्कम तातडीने तुमच्या खात्यात जमा होते आणि ऑनलाईन लुटारू ती रक्कम विविध खात्यात ट्रान्स्फर करतो. यासाठी एका लुटारूने आयडिया कस्टमर केअर सेंटर मधून बोलत असल्याचं भासवलं आणि पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीचा विश्वास संपादन केला.
दीपक सूर्यवंशी असं 47 वर्षीय फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 6 मे 2020ला एका मोबाईलवरून सूर्यवंशी यांना फोन आला. आयडिया कस्टमर केअर मधून बोलतोय, तुमचे सिम कार्ड थ्री-जी असून ते फोर-जी मध्ये अपडेट न केल्यास बंद पडेल. मग त्याने अधिकची माहिती घेतली आणि एकोणीस अंकी नंबर (सिम नंबर) त्याच्या नंबर वरून सूर्यवंशी यांना पाठवला. नंतर आयडिया कस्टमर केअर 12345 नंबर पाठवून, त्यावर तो नंबर एसएमएस करायला सांगितले. लॉकडाऊनमध्ये मोबाईल बंद झाल्यास बाहेर पडावे लागेल म्हणून सूर्यवंशींनी तो नंबर पाठवला. तुमचे सिमकार्ड अपडेट करायचे आहे का? असा आयडिया कडून मेसेज आल्याने सुर्यवंशीना विश्वास बसला. त्यांनी पुढची प्रक्रिया ही पार पाडली. 6 मे ला हे सिमकार्ड बंद झाले ते 7 मे च्या दुपारी 3 वाजता सुरू होईल, अस आयडिया कडून सांगण्यात आलं. पण 7 मे चे 3 वाजून गेले तरी सिम कार्ड सुरू होत नव्हते. म्हणून सूर्यवंशींनी त्या नंबरवर पुन्हा एकदा केला असता. तुमचेच काम सुरू आहे, एका तासाने पूर्ण होईल. असं म्हणून त्याने फोन स्विच ऑफ केला.
त्यामुळे सुर्यवंशीना काही शंका आल्याने, कारण तोच नंबर आयसीआयसीआय बँकेच्या खात्याशी जोडलेला आहे. खात्यात तीन लाखांहून अधिकची रक्कम ही आहे. म्हणून नेट बँकिंगद्वारे ते तपासण्याचा प्रयत्न केला तर बँक खाते उघडले नाही. म्हणून 7 मे च्या रात्रीच सूर्यवंशींनी बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. तेव्हा बँक खात्यावर दहा लाखाचे पर्सनल घेतल्याचं आणि त्यासह आधीचे तीन लाख असे तेरा लाख इतर खात्यात ट्रान्स्फर केल्याचं स्पष्ट झालं. मग त्यांच्या लक्षात आलं की तो एकोणीस नंबर त्याच्याकडे असणाऱ्या फोर जी सिमकार्डचे होते, त्यामुळे नंबरचे ऍक्सेस त्याच्याकडे गेले. पोलिसांकडे तक्रार केली. पण लॉकडाऊनमुळं गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. चिखली पोलीस याचा छडा लावत आहे.
संबंधित बातम्या :