कर्जत जामखेड मतदारसंघात अजित दादांची एंट्री; राम शिंदेंच्या आरोपांच्या फैरी अन् विधानसभा निवडणूक निकालानंतरचा पहिलाच दौरा
शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा निमित्य आमदार रोहित पवार यांच्या जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची दौरा होणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची (Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency) धुरा सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असून रोहित पवार (Rohit Pawar) हे येथील आमदार आहेत. अशातच जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची एंट्री होणार असल्याची माहिती आहे. त्याला कारण ठरलं आहे ते शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे. निकालानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच जामखेड मतदारसंघात भव्य कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला अजित पवार 17 एप्रिलला जामखेडला येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी अजित दादांच्यासोबत सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांची देखील हजेरी असणार आहे. त्यामुळे अजित पवार यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड मतदारसंघात
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राम शिंदे यांनी अजित पवार जाणीवपूर्वक जामखेडला सभेसाठी आले नसल्याचा गंभीर आरोप केला होता. यावेळी त्यांनी बोलताना काका-पुतणे एकच आहेत असा गंभीर आरोपही केला होता. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्या लढत झाली होती. या लढतीत रोहित पवार यांचा निसटता विजय मिळवला होता. यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते.
यावरून राम शिंदे यांनी कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता, असा आरोप राम शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर निकालानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच जामखेड मतदारसंघात भव्य कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही?- रोहित पवार
दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत सवाल केले आहे. यावेळी ते म्हणाले की, 'मा. अशोक चव्हाण साहेब आपण मोठे आणि 'आदर्श' नेते आहात, आपल्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे, पण आपल्याला भाजपमध्ये का जावं लागलं आणि आज आपल्यासारख्या मोठ्या नेत्याचं स्थान काय आहे, हे आख्ख्या राज्याला माहित्येय. त्यासाठी कुणालाही कानात सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न खऱ्या खोट्याचा तर या प्रश्नाचं उत्तर कर्जत-जामखेडने दोनदा दिलंय. महत्वाचं म्हणजे विधानपरिषद / राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही? तुम्हीच सांगा..
इतर महत्वाच्या बातम्या

























