गुडघ्याच्या दुखापती व त्यांचे प्रकार
Knee injuries and their types marathi news : गुडघ्याच्या दुखापती व त्यांचे प्रकार

डॉ. आशिष अरबट
Knee injuries and their types marathi news : खेळात सर्वात जास्त होणाऱ्या दुखापती म्हणजे गुडघ्याच्या दुखापती. खेळताना तुमचा गुडघा वाकला किंवा अचानक मार बसल्यास गुडघ्याच्या दुखापती होतात. गुडघे हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या सांध्यांपैकी एक आहे. ते तुम्हाला चालण्यास, धावण्यास, उडी मारण्यास, खाली बसण्यास तसेच खालून वर उठण्यास मदत करतात. तुमच्या गुडघ्यांच्या आत काही ऊती असतात ज्या एखाद्या धाग्यासारख्या मजबूत अशा जोडलेल्या असतात, त्यांना अस्थिबंधन म्हणतात. हे अस्थिबंधन गुडघ्यांच्या हाडांना एकत्र धरुन ठेवण्याचे काम करते आणि तुमचे सांधे स्थिर राखण्यास याची मदत होते. कधीकधी अचानक पडणे, पाय मुरगळणे, गुडघा वाकणे किंवा खेळाच्या दुखापतीमुळे तुमच्या अस्थिबंधनावर ताण येऊ शकतो किंवा ते फाटू शकतात. याला गुडघ्याच्या अस्थिबंधनाची दुखापत असे म्हणतात. या दुखापती अशा व्यक्तींमध्ये अधिक सामान्य आहेत जे अति व्यायाम करतात, मैदानी खेळ खेळतात किंवा धावताना अचानक दिशा बदलतात.
गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतींमुळे एखाद्याला तीव्र वेदना, सूज आणि हालचालींवर मर्यादा येऊ शकतात. जर दुर्लक्ष केले किंवा उपचार न केल्यास ते गुडघ्याच्या सांध्यांना कमकुवत करुन दिर्घकालीन समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. योग्य काळजी आणि विश्रांती घेतल्यास या दुखापती बऱ्या होण्यास मदत होऊ शकते आणि भविष्यातील समस्या देखील टाळता येतात. याच संदर्भात पुण्यातील जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट यांनी गुडघ्याच्या दुखापती आणि त्यांचे प्रकार सांगितले आहेत.
गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतींचे प्रकार
एसीएल दुखापत (अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट): हा गुडघ्याच्या अस्थिबंधनाच्या दुखापतीचा सर्वात सामान्य प्रकार आहे, विशेषतः जे फुटबॉल, बास्केटबॉल किंवा जिम्नॅस्टिक्ससारखे खेळताना या प्रकारची दुखापत होऊ शकते. या प्रकारची दुखापत सहसा जेव्हा तुम्ही अचानक थांबता, उडी मारताना अनाठायीपणे उतरता किंवा तुमची दिशा लवकर बदलता तेव्हा होते. गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर जर अँटीरियर क्रूसीएट लिगामेंट इजा (एसीएल) झाली असेल तर रुग्णाला वेदना, दुखापतीनंतर लगेच सूज येणे, वजन सहन न होणे आणि सांधे कडक होणे.
पीसीएल दुखापत (पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंट): गुडघ्यामध्ये या विशिष्ट प्रकारच्या अस्थिबंधनाच्या दुखापती गुडघ्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या जोरदार आघातामुळे होतात, जसे की चारचाकी अपघात किंवा पडणे. पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंट दुखापतीमुळे लगेचच तीक्ष्ण वेदना होऊ शकत नाहीत, परंतु कालांतराने ती आणखी बिकट होऊ शकते आणि चालण्यास त्रास होऊ शकतो
एमसीएल दुखापत (आतील बाजूच्या अस्थिबंधनास झालेली दुखापत): ही दुखापत सहसा तेव्हा होते जेव्हा तुमचा गुडघा एका बाजूला खूप वाकतो. खेळादरम्यान हे अनेकदा घडू शकते. यामुळे, गुडघे सरळ ठेवणे किंवा वाकवणे देखील कठीण होऊ शकते.
एलसीएल दुखापत (बाह्य बाजूच्या अस्थिबंधनास झालेली दुखापत): गुडघ्याच्या आतील बाजूस जास्त दाब पडल्याने बाहेरील भागावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे एलसीएल दुखापत होऊ शकते. प्रभावित भाग सुजू शकतो आणि चालताना किंवा गुडघे वाकवताना एखाद्याला त्रास होऊ शकतो.
रुग्णाला आर्थ्रोस्कोपिक पध्दतीने अस्थिबंधन दुरुस्तीचा सल्ला दिला जातो जो गुडघ्याची स्थिरता पुनर्संचयित करण्यासाठी आणि हालचालीची श्रेणी सुधारण्यासाठी एक कमीत कमी आक्रमक प्रक्रिया आहे. सांध्यातील दुरुस्तीचे मार्गदर्शन करण्यासाठी उपकरणे आणि कॅमेराच्या मदतीने फाटलेले किंवा खराब झालेले अस्थिबंधन दुरुस्त करण्यास मदत होते. ही प्रक्रिया जलद पुनर्प्राप्तीस मदत करते, सांध्याचा कडकपणा कमी करते, गुडघ्याच्या सांध्याची हालचाल आणि कार्य सामान्य राखण्यास मदत करते, जखमा आणि रक्तस्त्राव कमी होतो आणि संसर्गाचा धोका कमी होतो. प्रक्रियेनंतर रुग्ण त्यांची दैनंदिन दिनचर्या पुर्ववत सुरू करू शकतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























