KKR vs PBKS Match Called Off : चक्रीवादळ, तुफानी पावसानंतर कोलकाता आणि पंजाबमधील सामना रद्द, अजिंक्य रहाणेची डोकेदुखी वाढली
आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना कोणत्याही निकालाशिवाय रद्द करण्यात आला.

KKR vs PBKS Match Called Off IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना कोणत्याही निकालाशिवाय रद्द करण्यात आला. शनिवारी 26 एप्रिल रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने शानदार फलंदाजी केली आणि यजमान संघासमोर मोठी धावसंख्या उभारली. पण कोलकाताचा डाव सुरू होताच पावसाने व्यत्यय आणला आणि सुमारे दीड तास वाट पाहिल्यानंतर अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या हंगामात सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निकालामुळे कोलकाताच्या अडचणी वाढल्या आहेत.
Match 4⃣4⃣ between @KKRiders and @PunjabKingsIPL has been called off due to rain 🌧️
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
Both teams share a point each! #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/mEX2eETWgh
ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा चाहत्यांची कमतरता भासली आणि स्टेडियम पूर्णपणे भरले नाही. या हंगामातही हे दृश्य आधी दिसले होते. अशा परिस्थितीत कोलकात्याला चाहत्यांकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही. त्यात पंजाबच्या प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने आलेल्या प्रेक्षकांना शांत बसण्यास भाग पाडले. या हंगामात या दोन युवा सलामीवीरांनी पंजाबला अनेक वेळा तुफानी सुरुवात करून दिली होती आणि पुन्हा एकदा तेच घडले.
पहिल्याच हंगामात खेळणाऱ्या प्रियांश आर्यने (69 धावा) पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी सुरू केली. त्याने प्रभसिमरनसोबत पॉवरप्लेमध्ये संघासाठी अर्धशतकी भागीदारी केली. प्रियांशने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामात त्याने दुसऱ्यांदा 50 धावांचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, प्रभसिमरन सिंगनेही शानदार अर्धशतक झळकावले. प्रियांश बाद झाला तेव्हा 11.5 षटकांत दोघांमध्ये 120 धावांची भागीदारी झाली. यानंतर प्रभसिमरनने आक्रमण करत 83 धावांची शानदार खेळी खेळली. या आधारावर पंजाबने 20 षटकांत 201 धावा केल्या.
Innings Break
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
Strong comeback by the #KKR bowlers 👏
Are we in for another thriller? 🤔
Scorecard ▶ https://t.co/oVAArAaDRX #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/my3RtluYkp
केकेआरचा प्लेऑफचा झाला रस्ता कठीण
प्रत्युत्तरादाखल, कोलकाताच्या डावातील पहिले षटक नुकतेच संपले होते, तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. हा पाऊस एकदा सुरू झाला आणि नंतर थांबला नाही. अखेर रात्री 11 वाजता पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच यामुळे दोन्ही संघांना गुण वाटून घ्यावे लागले. याचा फायदा पंजाब किंग्जला झाला आणि संघ 11 गुणांसह पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. पण कोलकाता अजूनही 7 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत आधीच मागे असलेल्या गतविजेत्या केकेआरला आता उर्वरित सर्व 5 सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील, त्यानंतरच संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.





















