Shahajibapu Patil:....अन् शहाजी बापूंनी आपल्याच तोंडात मारून घेतली; पालकमंत्र्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बापूंची तूफान टोलेबाजी
Solapur News : लोकसभेचा पराभव नक्कीच जिव्हारी लागल्याचे सांगत भर सभेत शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलीय.

Solapur News : ज्यांनी आजवर सांगोल्याचे पाणी आडवायचे काम केले त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवले आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पाण्याची कामे केली त्याला घरी बसवले. आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे, आपण या चुकीबद्दल तोंडात मारून घ्यायला पाहिजे. असे सांगत भर सभेत शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलीय.
सांगोला येथे काल (3 एप्रिल) रात्री सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार ठेवला होता. यावेळी शेकापसे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील,ठाकरे गटाकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे , शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आणि तालुक्यातील बहुतांश विविध पक्षांचे नेते या सोहळ्यासाठी स्टेजवर उपस्थित होते. यावेळी बोलताना बापूंनी तुफानी फटकेबाजी केली.
लोकसभेचा पराभव नक्कीच जिव्हारी लागलाय- शहाजी बापू पाटील
लोकसभा निवडणुकीत दुष्काळी सांगोल्यात पाण्याची सर्वात जास्त कामे करणाऱ्या माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांचा पराभव झाला होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले होते. हा संदर्भ घेत बापूंनी तुफानी टोलेबाजी केली. आजवर सांगोल्याच्या पाण्यासाठी सर्वात मोठे काम निंबाळकर यांनी करूनही त्यांना घरी बसवले. मात्र ज्यांनी पाणी अडवले त्यांना खासदार केले, ही बाब आपल्याला काळजात चर्र करणारी वाटली पाहिजे. असे त्यांनी सांगितले. त्या बिचार्या निंबाळकरांनी आज तुमचा हारही घेतला नाही, असे सांगत लोकसभेचा पराभव नक्कीच जिव्हारी लागल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या पक्षात येऊ नका, मात्र तुमचा शेकाप हा महायुतीसोबत आणा
आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्कारासाठी सर्वच नेते एकत्र स्टेजवर आले असताना आता तरी जया भाऊ सांगतील त्या चिन्हावर मतदान करावे लागेल, असे सांगत तुम्हाला आईची शपत आहे, असे आव्हान बापूंनी केले. बापूंचा पराभव करून विजयी झालेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सल्ला देताना तुम्ही आमच्या पक्षात येऊ नका, मात्र तुमचा शेकाप हा महायुतीसोबत आणा असा सल्ला दिला. अर्जुन ओरडून कधीही कामे होत नसतात तर त्यासाठी सत्तेच्या गजेजवळ आपली गोटी ठेवावी लागते, असा सल्ला दिला शहाजी बापूंनी दिला.
हे ही वाचा
























