Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Blog Updates: पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारने बुलडोझर चालवला. पाचही जणांचा लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर आहेत. तसेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री एकनाश शिंदेंनी समज दिली. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
नाशिक पोलिसांनी हाणून पाडला दरोड्याचा प्रयत्न
नाशिक : शहरातील देवळाली येथील कुस्ती मैदानामध्ये काही संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, त्यांची चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार रस्त्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर आणि या पोलिसांमध्ये झटपट झाली आणि त्यातच एका संशयिताने खिशात ठेवलेल्या गावठी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्याच्या थेट मांडीमध्ये घुसली. या झटपटीमध्ये इतर संशयित पळून गेले आणि सिनेस्टाईल पद्धतीने पोलिसांनी त्यांना पकडले. जखमी संशयिताला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून इतरांकडून एक बंदूक, एक कोयता, दोरी आणि दरोडेसाठी लागणारे साहित्य पोलिसांना मिळून आले आहे. हे सर्व ताब्यात घेतलेले संशोध रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पुढील तपास उपनगर पोलिसांकडून सुरू आहेत.
नदी सुधार प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती द्यावी, बनसोडेंचा आदेश!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज शेकडो पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरलेत. मुळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकल्या जात असून, या प्रकल्पांमुळे नद्यांची वहन क्षमता कमी होणार आहे. 100 हून अधिक संघटनांनी शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशान भूमी असा लाँग मार्च काढून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना सुद्धा हा प्रकल्प राबविला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप बघायला मिळतोय.
दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज या मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन या नदीसुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी करत , नागरिकांचा या प्रकल्पाला होणारा वाढता विरोध पाहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना हे काम थांबविण्याच्या सूचना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.























