एक्स्प्लोर

Cyber hackers | लॉकडाऊन काळात सायबर भामट्यांच्या ऑनलाईन युक्त्या

लॉकडाऊन काळात सायबर क्राईमची संख्या वाढली आहे. त्यामुळे सायबर भामट्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केलं आहे.

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सायबर भामट्यांच्या कार्यपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या असून पुढील तपास करत आहेत.

कशाप्रकारे हे सायबर फ्रॉड तुम्हाला फसवू शकतात

कोविड 19 च्या मदतीने संदर्भात

तुम्हाला एक मेल येईल त्यामध्ये तुम्ही ॲमेझॉनवरुन खरेदी करा आणि त्याची एक ठराविक रक्कम कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाईल, अशी माहिती दिलेली असते. अशा मेलवर क्लिक करताच तुमची सगळी माहिती लांब कुठेतरी असलेल्या सायबर भामट्याकडे सहज पोहोचते. ज्याचा वापर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या नुकसान पोहचवण्यासाठी केला जाऊ शकतो.

नोकरी देणारा मेल लॉकडाऊनमध्ये बहुतांश लोकांच्या नोकरीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा फायदा घेत हे सायबर भामटे तुम्हाला एक मेल पाठवतात, ज्यामध्ये घरी बसवून तुम्ही काम करुन सहज पैसे कमवू शकता, अशी माहिती दिलेली असते. यासाठीच अॅमेझॉन डॉट कॉम आणि अशा बनावट लिंकचा वापर हे सायबर भामट्यांकडून केला जातो. त्याच्यावर क्लिक करताच तुमची बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पीन क्रमांकासह विचारले जाते व सायबर भामटे याचा उपयोग आर्थिक फसवणुकीचे साठी करतात.

सावधान! वेब सीरिज अन् चित्रपटांच्या माध्यमातून होतोय सायबर फ्रॉड; पोलिसांकडून नावं जाहीर

ऑनलाईन खरेदी स्कॅम बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. याचा फायदा घेऊन सायबर भामटे एखादी फेक वस्तू जसे की मोबाईल, पुस्तके, अन्य गृह उपयोगी वस्तू किंवा अगदी पाळीव प्राणी विकायला आहेत, अशी जाहिरात करतात. सदर लिंक Amazon.com किंवा अन्य e-portal सारखी दिसायला पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

बॉस स्कॅम कधी कधी तुम्हाला तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने एखादा ई-मेल किंवा मेसेज येतो की तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यासाठी Amazon gift card खरेदी केले आहे तर सोबतच्या लिंकवर क्लिक करुन ते redeem करा. सदर लिंक Amazon.com सारखी पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

टॅक्स स्कॅम यामध्ये नागरिकांना एक ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुम्ही काही कर (Tax) भरायचा बाकी आहे व तो तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करुन एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सदर लिंक ही सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते. पण सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व सायबर भामटे त्याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

जर तुम्हाला असे मेल आले तर काय खबरदारी घ्यावी

  • जर वरील नमूद प्रकारचे काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.
  • सध्याच्या काळात जर कोणी तुम्हाला घर बसल्या पैसे मिळवु शकता असे सांगत असतील तर लगेच विश्वास ठेऊ नका तुम्ही फसविले जाण्याची शक्यता अधिक आहे.
  • ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा. एखादी वस्तू जर कोणी बाजारभावापेक्षा खुप स्वस्त विकत असेल तर सतर्क व्हा.
  • इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व काही माहिती खरीच असेल असे नाही.
  • जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी gift card coupon भेट दिली आहे असा काही ई-मेल किंवा मेसेज आला तर त्याची वरिष्ठांकडून खात्री करून घ्यावी.
  • जर तुमची वरील नमूद प्रकाराने किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आँनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्याची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवा, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण माहिती द्यावी. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.
Cyber Crime | फ्री वेबसाईट्सवर चित्रपट किंवा वेबसिरिज पाहताय? सावधान!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
Embed widget