Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावा
Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावा
Nilesh Ojha : गेल्या पाच वर्षांपासून दिशा सालियनच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरुच आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर सातत्याने कथित आरोप करत भाजप हल्ला करत आहे. दिशावर बलात्कारानंतर हत्या केल्याचा आरोप भाजप करत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या प्रकरणात दिशा सालियान केस वकील निलेश ओझा मांडत असून त्यांनी अत्यंत बेछूट पद्धतीने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. आता त्याच निलेश ओझा यांची सुद्धा पार्श्वभूमी समोर आली असून अत्यंत वादग्रस्त त्यांचा इतिहास राहिला आहे.























