एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
IPL 2025: 4 अन् 6 सोडा...एक धाव घेणंही जमेना; आयपीएल 2025 मधील सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे 5 गोलंदाज
IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू कोणत्या गोलंदाजांनी टाकले जाणून घ्या...
IPL 2025
1/7

सध्या आयपीएल 2025 चा हंगाम सुरु आहे. आतापर्यंत एकूण 44 सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएल 2025 मध्ये, गोलंदाजांनी फलंदाजांपेक्षा जास्त प्रभावित केले आहे. गोलंदाजांनी स्फोटक फलंदाजांना एक-एक धाव घेण्यास अडचणी आल्या. (Image Credit-IPL 2025)
2/7

आयपीएल 2025 च्या हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू कोणी टाकले जाणून घ्या...(Image Credit-IPL 2025)
3/7

1. मोहम्मद सिराज- गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलेला मोहम्मद सिराज या वर्षी गुजरात टायटन्सचा भाग आहे आणि तो उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 32 षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने 93 डॉट बॉल टाकले आहेत.(Image Credit-IPL 2025)
4/7

2. खलील अहमद- चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने या हंगामात 93 डॉट बॉल टाकले आहेत. त्याने 9 सामन्यांमध्ये एकूण 32 षटके टाकली आहेत आणि 288 धावा दिल्या आहेत.(Image Credit-IPL 2025)
5/7

3. जोश हेझलवूड- राजस्थानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात जोश हेझलवूडने 19 वे षटक टाकले आणि फक्त 1 धाव दिली. या हंगामात आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये हेझलवूडने 32.5 षटके टाकली आहेत, त्यापैकी 93 चेंडू डॉट टाकले आहेत.(Image Credit-IPL 2025)
6/7

4. जोफ्रा आर्चर- इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे, त्याने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 87 डॉट बॉल टाकले आहेत.(Image Credit-IPL 2025)
7/7

5. प्रसिध कृष्णा- गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने 8 सामन्यात 31 षटके टाकली आणि 226 धावा दिल्या. कृष्णाने आतापर्यंत 85 डॉट बॉल टाकले आहेत.(Image Credit-IPL 2025)
Published at : 27 Apr 2025 10:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























