एक्स्प्लोर
डोनाल्ड ट्रम्प- झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊसमधील राड्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी रोममध्ये पुन्हा भेटले; आता ट्रम्प म्हणतात, 'मला वाटतंय पुतीन मला नुसतंच...'
Zelensky and donald trump at the Vatican : दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्याशी झालेल्या जोरदार वादविवादानंतर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची ही पहिलीच भेट होती.

Zelensky and donald trump at the Vatican
Source : Getty Images
Zelensky and donald trump at the Vatican : पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोममध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelensky and donald trump at the Vatican) यांची सुद्धा भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियात पोस्ट झाली असून भेटीमधील तपशील सुद्धा समोर आला आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व आहे. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन युद्ध (Russia-Ukraine War) संपवू इच्छितात की नाही याबाबत मला शंका वाटते. हे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी एक दिवस आधी सांगितले होते की रशिया आणि युक्रेनमध्ये लवकरच शांतता करार होऊ शकतो. दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्याशी झालेल्या जोरदार वादविवादानंतर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची ही पहिलीच भेट होती.
पुतिन यांना वेगळ्या पद्धतीने हाताळले पाहिजे
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानंतर अमेरिकेला परतताना ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गेल्या काही दिवसांत पुतिन यांनी युक्रेनमधील निवासी क्षेत्रे, शहरे आणि गावांवर अंदाधुंद क्षेपणास्त्रे डागली आहेत."
झेलेन्स्की म्हणाले, ही बैठक ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे
ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर म्हटले की, ही भेट चांगली झाली आणि त्यात ऐतिहासिक होण्याची क्षमता आहे. त्यांनी X वर लिहिले की, आम्ही खासगीत अनेक गोष्टींवर चर्चा केली. चर्चेत आलेल्या मुद्द्यांचे चांगले परिणाम होतील अशी आशा आहे.
आमचे उद्दिष्ट आमच्या लोकांच्या जीवाचे रक्षण करणे आणि पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदी लागू करणे आहे. आपल्याला एक मजबूत आणि चिरस्थायी शांतता निर्माण करायची आहे जी पुन्हा कधीही युद्ध होऊ देणार नाही. जर आपण एकत्रितपणे चांगले परिणाम मिळवले तर ही बैठक ऐतिहासिक ठरू शकते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.
आमचे उद्दिष्ट आमच्या लोकांच्या जीवाचे रक्षण करणे आणि पूर्ण आणि बिनशर्त युद्धबंदी लागू करणे आहे. आपल्याला एक मजबूत आणि चिरस्थायी शांतता निर्माण करायची आहे जी पुन्हा कधीही युद्ध होऊ देणार नाही. जर आपण एकत्रितपणे चांगले परिणाम मिळवले तर ही बैठक ऐतिहासिक ठरू शकते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार.
दोन दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर 70 क्षेपणास्त्रे डागली
ट्रम्प म्हणाले की, मी या हल्ल्यावर अजिबात खूश नाही. ट्रम्प म्हणाले की, रशियाने कीववर केलेल्या हल्ल्यावर ते खूश नाहीत. त्यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, कीववरील रशियन हल्ल्यांमुळे मी खूश नाही. हे आवश्यक नव्हते आणि वेळ खरोखरच वाईट होती. व्लादिमीर, थांबा! दर आठवड्याला 5 हजार सैनिक मरत आहेत. चला शांतता करार करूया. दोन दिवसांपूर्वी, बुधवारी रात्री, रशियाने युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला, तर 70 हून अधिक जण जखमी झाले. गेल्या 9 महिन्यांतील युक्रेनच्या राजधानीवरील हा सर्वात मोठा हल्ला होता.
हल्ल्यामुळे अनेक इमारतींना आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 42 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यात सहा मुले होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने युक्रेनवर 70 क्षेपणास्त्रे आणि 145 ड्रोनने हल्ला केला, ज्यांचे मुख्य लक्ष्य राजधानी कीव होते. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणतात की या हल्ल्याचा उद्देश अमेरिकेवर दबाव आणणे होता. कीवमध्ये 13 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात निवासी इमारती आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचा समावेश होता.
अमेरिकेने शांतता करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली
अमेरिका लवकरच रशिया-युक्रेन शांतता करारातून बाहेर पडू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात 18 एप्रिल रोजी रशिया-युक्रेन शांतता करारातून माघार घेण्याची धमकी दिली होती. जर रशिया किंवा युक्रेन या करारासाठी तयार नसेल तर ते एक मूर्खपणाचे पाऊल असेल आणि आम्ही शांतता करारातून बाहेर पडू, असे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या आधी, त्याच दिवशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले होते की, जर येत्या काळात रशिया आणि युक्रेनने युद्ध संपवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही तर अमेरिका शांतता प्रयत्न सोडून देईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन जवळपास 90 दिवस झाले आहेत. या काळात, युक्रेन युद्ध सोडवण्याबाबत अमेरिका आणि रशियामध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. परंतु ट्रम्प प्रशासनाला शांतता प्रस्थापित करण्यात फारसे यश मिळालेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा























