Pune Instagram Crime : इंस्टाग्रामवरील मैत्री, शारीरिक संबंधाला नकार; तरुणीचा मॉर्फ केलेला अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Pune Instagram Crime : शारिरीक संबंध ठेवण्याला नकार दिल्याने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे.

Pune Instagram Crime : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं कळस घातला आहे. त्यात (Pune Instagram Crime) मैत्री, प्रेम आणि शारिरीक संबंधातून (Pune Crime news) निर्माण झालेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. शारिरीक संबंध ठेवण्याला नकार दिल्याने तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 19 तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन प्रथमेश गुळवे याच्यावर आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
तरुणी आणि प्रथमेश गुळवे यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्री वाढली. इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणाने एकतर्फी प्रेमातून या प्रथमेश गुळवे याने अप्रत्यक्षरित्या तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली. आरोपीने फिर्यादीला कात्रज चौकात बोलावून शारीरिक सुखाची मागणी मागणी केली. त्यावेळी तिने त्याला विरोध केला असता आरोपीने तरुणीचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅप वर व्हायरल केला. यामुळे तरुणीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होऊन आरोपीने तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
तरुणीने नकार दिल्यानंतर तरुणीचा व्हिडीओ प्रथमेशने मॉर्फ केला त्यानंतर हा व्हिडीओ थेट whatsapp वर व्हायरल केला. हे लक्षात येताच तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली. हा प्रकार 11 डिसेंबर 2023 रोजी इंस्टाग्राम अकाऊंटवर घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियाच्या गुन्ह्यांत वाढ
काही दिवसांपूर्वीही नग्न फोटो व्हायरल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी (Pune Crime) शिरूरमधील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवेंद्र धरमचंद फुलपगार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर देवेंद्रनं त्याच्या प्रियसीला त्रास द्यायला सुरुवात केली होती. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे तिने या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे देवेंद्रनं प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
