
पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप; बार मालकांवर आरोप करणाऱ्या रविंद्र धंगेकरांना मेधा कुलकर्णींनी सुनावले
पब, अंमली पदर्थ, हुक्का पार्लवर वर्षभर बोलत आहे. पण पोलिसांना मात्र जाग येत नाही. प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी केली आहे.

पुणे : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरुन (Pune Drugs Case) आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) केलाय. त्यांच्या या आरोपावर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींनी (Medha Kulkarni) प्रत्युत्तर दिले आहे. धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते. त्याचं पुढे काय झाल? एक प्रकरण धरतात सोडून देतात… दुसरे धरतात सोडून देतात? त्या कागदाचे काय झाले ते आधी सांगा म्हणत मेधा कुलकर्णी यांनी धंगेकराना जाब विचारला आहे.
आम्ही एखादा मुद्दा उपस्थित करतो आणि शेवटपर्यंत नेतो मध्येच सोडत नाही, असा टोला धंगेकरांना मेधा कुलकर्णींनी लगावला आहे. पुण्याची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करणार आहे. पुण्यातील ड्रग प्रकरणावर पुणे पोलीस धडधड कारवाई करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
तरुणांना बरबाद करण्याचे काम सुरू : रविंद्र धंगेकर
रविंद्र धंगेकर म्हणाले, गेले वर्षभर मी सातत्याने पब, अंमली पदर्थ, हुक्का पार्लवर वर्षभर बोलत आहे. पण पोलिसांना मात्र जाग येत नाही. प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. सहा- सहा महिन्यांनी नाव काढण्यापेक्षा एकदाच सगळी नावे बाहेर काढा, सर्व हुक्का पार्लर सील करा. हुक्क पार्लर ही काय संस्कृती आहे. तरुणांना बरबाद करण्याचे काम सुरू आहे. सुरक्षीत पुणे, माझे पुणे ही माझी मागणी आहे. त्याचबरोबर रात्री उशीरापर्यंत पार्टी आयोजित करणाऱ्या अक्षय कामठेच्या मागे कोण आहे याचा शोध घ्या.
पुण्यातील एफसी रोडवरील लाउंज सील
पुण्यातील एफसी रोडवरील लाउंजमधे ड्रग सापडल्याचा आरोप झाल्यानंतर हा लाउंज सील करण्यात आले आहे. पुणे ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यात. दोन बीट मार्शल यांना काल निलंबित करण्यात आलं यानंतर आज पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील निलंबित करण्यात आले आहे.
Video :
हे ही वाचा :
पुणे ड्रग्ज प्रकरण : जेवण अन् दारूवर 85 हजार उडवले, 8 अटकेत, व्हिडिओतील तरुणांचा शोध सुरु; पोलीस उपायुक्तांची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
