एक्स्प्लोर

बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत.

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सोशल माध्यमावर याबाबतचे जाहीर आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील संघटनांकडून केली जात आहे. त्याच पार्श्भूमीवर बीड जिल्हा बंद पुकारला आहे. तर दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यातील राजकीय वातावरणही या घटनेवरुन तापलं असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत. आता, पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरुन केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे, या दोन्ही घटनांचं कनेक्शन आहे का, याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक मुंडे यांचंही नाव असून त्यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणारुन बीडमधील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून विविध संघटनांनी बीड बंदची हाक दिली आहे. 

सुत्रधारास अटक करण्याची मागणी

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मसाजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे. मात्र, मुख्य सुत्रधारास अटक करण्यात यावी, अशी मागणई करत उद्या बीड जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यात 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

मराठा, ओबीसी,धनगर समाजाचे आरक्षण मागणी अनुषगांने आंदोलने चालू आहेत तसेच 16 डिसेंबर 2024 पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.याचं अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेता.अचानक घडणाऱ्या घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मनाई आदेश जारी करण्यात आले असल्याचे बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकद्रारे कळवले आहे.दि.13 डिसेंबर 2024 रोजी 00.01 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत  बीड जिल्हयात हे आदेश लागू असणार आहेत.

धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात. त्यामुळे बीडला बदनाम करू नये, असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं. धनंजय मुंडेंनी कोणावरही नाव न घेता विरोधक म्हणत टोला लगावला. दुसरीकडे भाजप नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनीही अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा

धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget