धोका वाढतोय? 11 दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये एक हजार मुलांना कोरोनाची लागण
Pimpri-Chinchwad : शाळा सुरुच ठेवा, अशी मागणी एका वर्गाकडून केली जातीये. पण त्यांनी कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या लहान मुलांची आकडेवारीकडे ही लक्ष द्यायला हवं.

Pimpri-Chinchwad : शाळा सुरुच ठेवा, अशी मागणी एका वर्गाकडून केली जातीये. पण त्यांनी कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या लहान मुलांची आकडेवारीकडे ही लक्ष द्यायला हवं. कारण पिंपरी चिंचवडमध्ये अवघ्या अकरा दिवसात एक हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातीये. सुदैवाची बाब इतकीच आहे, की सध्या केवळ चार मुलंच पालिकेच्या रुग्णालयात दाखल असून त्यांना ही सौम्य लक्षण आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांना कोरोनावर मात देखील केलीये.
तारीख 0ते5 6ते18 एकूण
1 जाने 2 10 12
2 जाने 3 16 19
3 जाने 0 15 15
4 जाने 6 35 41
5 जाने 10 55 61
6 जाने 16 75 91
7 जाने 28 114 142
8 जाने 16 115 131
9 जाने 23 166 189
10जाने 32 115 147
11जाने 30 141 171
असे गेल्या अकरा दिवसांत 1023 कोरोना रुग्ण आढळले आहेत. पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांची शाळा ही ऑनलाईनच सुरू होती. पण 6 ते 18 वयोगटातील सर्वच मुलांच्या शाळा या ऑफलाईन सुरू होत्या. हे पाहता वरील आकडेवारी आणखी चिंता निर्माण करते. कारण ज्यांची शाळा ऑनलाईन सुरू होती, त्या 0 ते 5 वयोगटातील केवळ 166 मुलांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील बहुतांश हे पालकांच्या संपर्कात आलेत. मात्र ज्यांची 9 जानेवारीपर्यंत ऑफलाईन शाळा होती, त्या 6 ते 18 या वयोगटातील तब्बल 857 मुलांवर कोरोनाने हल्ला केलाय. सुदैवाची बाब इतकीच आहे, की पालिकेने लहान मुलांसाठी राखीव ठेवलेल्या नवीन जिजामाता रुग्णालयात सध्या केवळ चारच लहान मुलं भरती आहेत आणि त्यांना ही सौम्य लक्षण आढळत आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांनी तर कोरोनावर मात देखील केलीये. हे पाहता शाळा ऑनलाईन सुरू ठेवणं की ऑफलाईन सुरू ठेवणं योग्य हे ज्याचं त्यानं ठरवावं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
