Beed VIDEO : माझ्या भावाला खूप वेदना दिल्या, त्या हरामखोरांचं काय करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं; धनंजय देशमुखांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रिया, अश्रू अनावर
Santosh Deshmukh Murder Case Photo : राष्ट्रवादीच्या कार्यालयात सगळे आरोपी बसत होते आणि त्या हरामखोरांना पोलिस यंत्रणा पोसत होती असं धनंजय देशमुख म्हणाले.

बीड : माझ्या भावाला तीन तास मारहाण होत होती आणि त्या हरामखोर आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनी आमची दिशाभूल केली. माझ्या भावाला झालेली भयावह मारहाण पाहून काळीज हेलावून गेलंय, खूप वेदना होत आहेत अशी पहिली प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. माझ्या भावाला खूप वेदना दिल्या गेल्या, आता त्या हरामखोरांवर काय कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी संतापजनक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. त्यानंतर धनंजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला. नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालं. आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागला. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. यावेळी संतोष देखमुखांना मारहाण करताना एकमेकांकडे पाहून हसले जात होते. संतोष देशमुखांचे कपडे काढले जात होते, त्यांना मारहाण केली जात होती. हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही.
आरोपींचे समर्थन केलं जात होतं याची चीड
धनंजय देशमुख म्हणाले की, "पैशाच्या हव्यासापोटी ते काय करू शकतात हे सगळ्यांना माहिती होतं. तरीही त्या आरोपींचे समर्थन केलं जात होतं याची चीड येत होती. मी आतापर्यंत संयमाने बोलत होतो, कारण आपल्या हाती काही नाही हे मला माहिती होतं. आता जे काही समोर आलं त्यामुळे भयंकर वाटतंय. माझ्या भावाला खूप त्रास दिला. मला ते पाहून काहीच कळत नाही. माझ्या लेकरांना काय सांगणार याची चिंता आहे."
राष्ट्रवादीचे कार्यालय नव्हे तर आरोपींचे कार्यालय होतं
धनंजय देशमुख म्हणाले की, "वाल्मिक कराडने त्यांना सांगितलं होतं की संतोष देशमुखला मारून टाका. त्यामुळे या आरोपींना काहीच भीती नव्हती. त्या पोलिस यंत्रणांनी त्यांना पोसलं होतं. पोलिसांनी आमची दिशाभूल केली, आम्हाला दुसरीकडे पाठवलं. तीन तास मारहाण होत होती. राष्ट्रवादी पक्षाचं ऑफिस हे गुन्हेगारांचे ऑफिस होतं. त्या ठिकाणी ते हरामखोर बसायचे.पोलिस यंत्रणेला माहिती होतं की ते सराईत गुन्हेगार आहेत."
मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं
या प्रकरणी आरोपी आणि पोलिसांवर काय कारवाई करणार याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. ही हत्या पूर्वनियोजित होती आणि त्यामध्ये पोलिसही सामील आहेत असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा:
























