एक्स्प्लोर
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला 90 दिवस पूर्ण होत असताना सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वाल्मिक कराडच ह्या घटनेचा सुत्रधार असल्याचे सीआयडीने म्हटलं आहे.
Santosh deshmukh Photo viral chargsheet
1/8

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला 90 दिवस पूर्ण होत असताना सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून वाल्मिक कराडच ह्या घटनेचा सुत्रधार असल्याचे सीआयडीने म्हटलं आहे.
2/8

सीआयडी पोलिसांच्या दोषारोपपत्रात तब्बल 1000 पानांची माहिती देण्यात आली असून संबंधित घटनेचा थरारक घटनाक्रम देखील यातून उलगडला आहे.
3/8

संतोष देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढून, त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. आता, सीआयडीच्या चार्जशीटमधून या घटनेचे फोटो समोर आले आहेत.
4/8

चार्जशीटमधून समोर आलेले फोटो पाहून कोणाचेही काळीज पिळवटून जाईल असे हे चित्र आहे. कारण, या फोटोत संतोष देशमुख यांना केवळ अंतवस्त्रावर बसवून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.
5/8

दिवंगत संतोष देशमुख यांच्या अंगावरील, पाठीवरील व्रण देखील स्पष्ट दिसत असून अतिशय हतबल झालेला युवक संरपंच पाहायला मिळत आहे.
6/8

विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींकडून व्हिडिओ काढण्यात येत असल्याचंही दिसून येत आहे. त्यावरुन, आरोपींनी राक्षसी कृत्य केल्याचं आता पुराव्यानिशी उघड झालं आहे.
7/8

मारहाणीनंतर आरोपींनी दिवंगत संतोष देशमुख यांच्यासमवेत फोटो काढला असून आरोपी हसत असतानाचे देखील या चार्जशीटमधून समोर आलेल्या फोटोतून दिसून येत आहे.
8/8

दरम्यान, चार्जशीटमधून समोर आलेलं भयानक राक्षसी कृत्यू आणि मारहाणीच्या घटनेतील फोटो पाहून संतोष देशमुख यांचे बंध धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले, तर या 8 आरोपींना पाठबळ मिळाल्यानेच त्यांची इथपर्यंत मजल केल्याचंही धनंजय यांनी म्हटलं.
Published at : 03 Mar 2025 09:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























