Santosh Deshmukh Murder Case : अजून कोणता पुरावा हवाय? संतोष देशमुखांना झालेल्या क्रूर मारहाणीचे फोटो एबीपी माझाच्या हाती!
Santosh Deshmukh Murder Case : अजून कोणता पुरावा हवाय? संतोष देशमुखांना झालेल्या क्रूर मारहाणीचे फोटो एबीपी माझाच्या हाती!

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मारहाण करण्यात आलेले फोटो एका व्हाट्सअॅप ग्रुपवरुन शेअर करण्यात आले होते. हे फोटो एबीपी माझाच्या हाती आले आहेत. खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. या हत्येप्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड असल्याचे सिद्ध झाले आहे.
View this post on Instagram
संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं
संतोष देशमुख यांना क्रूरपणे संपवण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झाले आहे.
वाल्मिक कराडचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार
आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. तसेच एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली हे पुरावे सीआयडीने आरोप पत्रात नमूद केले आहे. यामध्ये 66 भक्कम पुरावे जप्त केले असून 184 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले तर पाच गोपनीय साक्षीदारही महत्त्वाचे ठरले आहेत. सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले. या प्रकरणात फोनवरून संभाषण झालेली ऑडिओ क्लिप आणि देशमुख यांना मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर केज न्यायालयात 12 मार्चला पहिली सुनावणी होणार आहे.
View this post on Instagram

इतर महत्त्वाच्या बातम्या

























