Swargate Case :Dattatreya Gadeला 1 लाख रुपयांसाठी पकडून दिलं नाही,Gunat ग्रामस्थांनी बक्षीस नाकारलं
Swargate Case :Dattatreya Gandeला 1 लाख रुपयांसाठी पकडून दिलं नाही,Gunat ग्रामस्थांनी बक्षीस नाकारलं
नराधम दत्तात्रय गाडेला एक लाख रुपयांसाठी पकडून दिलं नाही, गुनाट ग्रामस्थांनी बक्षीस नाकारलं.
Swargate Bus Depot Crime News: स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये (25 फेब्रुवारीला) 26 वर्षीय युवतीवर बलात्कार (Swargate Bus Depot Crime News) करणारा नराधम दत्तात्रय गाडे हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) बलात्काराच्या घटनेनंतर त्याच्या गुनाट या गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पोलिसांची अनेक पथकं गुनाट गावात पोहोचली होती. यावेळी पोलिसांनी दत्ता गाडेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर तो गावातच असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर दत्तात्रय गाडेला मध्यरात्री शेतातून अटक केली.
दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाखांचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं. दत्तात्रय गाडेला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुनाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांचीही पोलिसांना मोठी मदत झाली. त्यामुळे आता पोलिसांनी जाहीर केलेलं एक लाखाचं बक्षीस कोणाला मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेला अटक केल्यानंतर गुनाट गावात बक्षीसावरुन दोन मतप्रवाह असल्याचं दिसत आहे.






















