Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग तीन विजय मिळवून उपांतफेरीमध्ये धडक मारली पण काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माची शरीरयष्टी आणि फिटनेस वर प्रश्न उपस्थित करून देशात नवा वाद निर्माण केलाय. याच पार्श्वभूमीवर पाहूया क्रिकेटर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी दुबईतून पाठवलेला हा रिपोर्ट. लोकशाही मध्ये प्रत्येकाला आपलं मत आपले विचार मांडण्याचा संपूर्णपणे हक्क आहे आणि त्याचा प्रत्येकाने आदर राखला पाहिजे. परंतु आत्ताच्या घडीला रोहित शर्माच्या वजनावरन आणि त्याच्या फिटनेस वरन जी टिप्पणी राजकीय नेत्यांकडन होती ती मला जरा चुकीची वाटते त्याच कारण मी तुम्हाला सांगतो काही खेळाडू असे असतात की जे फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असतात आणि ते ते दाखवायला सुद्धा जातात उदाहरणार्थ विराट कोहली की विराट कोहलीच्या फिटनेसचे त्याच्या व्यायामाचे बरेचसे रील्स म्हणा किंवा बऱ्याचशा पोस्ट येतात रोहित शर्माचे. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की रोहित शर्मा त्याच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देत नाही. त्यांनी आतापर्यंत भारतीय संघाकरता केलेली कामगिरी तुम्ही एक सेकंद बघा आणि त्याचबरोबर पत्रकार म्हणून ज्या ज्या वेळेला भारतीय संघाचा सराव असू देत किंवा त्याची तयारी असू देत हे मी बघतो तेव्हा रोहित शर्मा सुद्धा किती मेहनत करतो हे मी स्वतः पाहिलेल आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा सराव आतल्या बाहेर. बाजूला चालू असताना आतल्या बाजूला जाऊन संपूर्ण कीट घालून पॅड्स असूदेत, ग्लोव्स असूदेत, हेल्मेट असूदेत, रनिंग बिटवीन द विकेटशी सराव करताना मी कित्येक वेळेला पाहिलेला आहे. काही जणांची अंगकाठी ही मूळता बारीक असते, काही जणांची थोडीशी डबल हाडी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची असते. रोहित शर्मा, ऋषभ पंत हे डबल हाडी प्रकारात मला वाटतात, परंतु त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत माझ्या मनात. अजिबात शंका नाहीये त्याच कारण सध्याच्या घडीला भारतीय संघामध्ये फिट आणि सुपर फिट एवढ्या दोनच कॅटेगरी मला दिसतात अनफिट प्लेयर दिसत नाही त्यामुळे रोहित शर्माच्या फिटनेस बाबत कोणी शंका घेण्याचे कारण मला तरी वाटत नाही.























