Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रिया
Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मारहाण करण्यात आलेले फोटो एका व्हाट्सअॅप ग्रुपवरुन शेअर करण्यात आले होते. हे फोटो एबीपी माझाच्या हाती आले आहेत. खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. या हत्येप्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड असल्याचे सिद्ध झाले आहे. संतोष देशमुख यांना क्रूरपणे संपवण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर देशमुखांना क्रूरतेने संपवलेले फोटो समोर आले आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झाले आहे.






















