(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवार अंजनीमध्ये दाखल, आर आर आबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले
Sharad Pawar, at Anjani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज (दि.8) अंजनीमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पन केला आणि दर्शन घेतले आहेत.
Sharad Pawar, at Anjani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज (दि.8) अंजनीमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पन केला आणि दर्शन घेतले आहेत. यावेळी आर आर पाटील अमर रहे , अशा घोषणाही कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. यावेळी शरद पवारंच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटीलही उपस्थित होत्या.
शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवारांचे मार्गदर्शन
शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम शरद पवारांनी सिद्धराज सह शेती पाणी पुरवठा संस्थेच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ - बेदाणा सेमिनार व नवीन इमारतीच्या उद्घाटन शरद पवारांचे हस्ते करण्यात आले आहे.
माणदेश प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहणारा आहे
मी काल ऐकेठिकाणी बोलत असताना सांगितले की, माणदेश प्रतिकूल परिस्थितीतून उभा राहणारा आहे. आज तुम्ही पाहा, महाराष्ट्रातील अनेक क्षेत्र आहेत, जिथे या भागाचं नाव आहे. मराठी साहित्यात अनेक लेखक, कवी झाले. पण मानदेशातील कवींची नोंद नेहमी मराठी भाषिकांनी घेतली, असंही शरद पवार यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितलं.
मी दिल्लीत कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घ्यायचो. त्यामुळे काही गोष्टी समजतात, काही गोष्टी दुरुस्त करता येतात. शेतकऱ्यांना न्याय देता येतो. सगळेजण चुकीचं काम करतात, हा प्रचार आहे तो खरा नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचाही आत्मविश्वास वाढतो. कृषी बाजार समितीबाबत केंद्र सरकारने तीन कायदे केले होते, ते आपल्या हिताचे नाहीत. त्या कायद्यासंबंधी जी चर्चा व्हायला हवी होती, ती लोकसभेत आणि राज्यसभेत झाली. त्यावेळी सभागृहात गोंळध झाला होता. मात्र, सरकारने गोंधळात कायदे मंजूर केले, असंही शरद पवारांनी सांगितले.
पंजाब, हरियाणातील काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दिल्लीमध्ये यायच्या रस्त्यावर शेतकरी येऊन बसले होते. 1 वर्ष ते तिथे होते. उन्हाळा, थंडी दिल्लीत कडक असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी तेथे बसून राहिला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासणे महत्वाचे आहे. माझ्याकडे निवेदन दिले, मात्र आमची सत्ता नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं, असंही शरद पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar : शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...