एक्स्प्लोर

Sambhaji Bhide and NCP Sharad Pawar : संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून जीवितास धोका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पोलिसांत धाव

Sambhaji Bhide and NCP Sharad Pawar, Pune : संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून जीवितास धोका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची पोलिसांत धाव

Sambhaji Bhide and NCP Sharad Pawar, Pune : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे  (Vikas Lawande) यांची शिवप्रतिष्ठाणच्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीये. संभाजी भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यापासून जीविताला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. विकास लवांडे यांनी स्वतःच्या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून नुकताच एक व्हिडिओ शिवप्रतिष्ठान या संघटनेवर टीका करणारा केला होता.  या व्हिडिओ नंतर विकास लवांडे (Vikas Lawande) यांना राज्यभरातून धमकीचे फोन येत असल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आलाय. विकास लवांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे लेखी तक्रार केलीये. 

काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी आपल्या व्हिडिओमध्ये संभाजी भिडे यांच्याबाबत भाष्य केलं होतं.  ज्याप्रकारे इस्लामच्या नावाने काही सामान्य मुस्लिम तरुणांमध्ये काही आतंकवादी संघटना किंवा तालिबानी विचार रुजवले जातात, त्याच पद्धतीने शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून हिंदू आतंकवादी बनवण्याचा संभाजी भिडे यांचा प्रयत्न आहे, असा उल्लेख विकास लवांडे यांनी केला होता. 

विकास लवांडे यांचं पत्र जसंच्या तसं

मी विकास सदाशिव लवांडे (वय ५३ वर्षे) रा. शिंदेवाडी, पो. अष्टापुर, ता. हवेली, जि. पुणे आपणास तक्रार अर्ज करतो की, मी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता व संघटक सचिव म्हणून गेल्या काही वर्षापासून संक्रीय आहे. तसेच मी माझ्या गावात शिक्षण संस्था स्थापन करुन माध्यमिक विद्यालय यशस्विपणे चालवित आहे. माझ्या गावात मी २००५ ते २०१० मध्ये सरपंच या पदावर कार्यरत होतो. तसेच मी भागवत वारकरी सांप्रदायात देखील कायम सक्रीय असतो. मी सोशल माध्यमामध्ये फेसबुक, एक्स, व्हॉटसप, इन्स्टाग्राम आणि माझ्या स्वतःच्या "सत्याग्रही" नावाच्या यू ट्यूब चॅनेलवर सक्रीय असतो.

आता दिनांक १२/२/२०२५ रोजी मी माझ्या सत्याग्रही या यूट्यूब चॅनेलवर एक प्रासंगिक घडामोडीवर आधारित विष्लेषणात्मक व्हिडीओ बनवुन भाष्य केले आहे. ज्यामध्ये रायगडावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजी भिडेंच्या संघटनेमार्फत सर्व तरुणांच्या हातात लाठया काठ्या घेवून गटकोट किल्ले मोहिम राबविली त्यावर आधारित मी भाष्य केलेले आहे. ज्यामध्ये मी कुटुंबातील युवकाना देव, देश, धर्म वरील श्रध्दा व भावनांच्या आधाराने एकत्र केले जाते. मात्र त्यांना भारतीय संविधान व लोकशाहीचे महत्व व • सविस्तर/सखोल माहिती न देता संविधोनाच्या व लोकशाहीच्या विरुध्द आहे. ज्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होवून सामाजिक वातावरण बिघडविले जाते म्हणून मी माझ्या सत्याग्रही या युट्यूब द्वारे विश्लेषणात्मक भाष्य करताना म्हंटले आहे की, "ज्याप्रमाणे इस्लामच्या नावाने काही सामान्य मुस्लिम तरुणांमध्ये काही आतंकवादी संघटना किंवा तालीबानी विचार रुजविले जातात त्याच पध्दतीचा हा हिंदु आतंकवादी बनविण्याचा संभाजी भिडे यांचा प्रयत्न आहे. यात तरुणांची माथी भडकावुन हिंसक व द्वेष बुध्दी रुजविली जारते. यापासून तरुणांनी सावध रहावे, आपल्या सद्सदविवेक बुध्दीचा वापर करावा अशाप्रकारचे मी आवाहन केले आहे. आपण तो पूर्ण व्हिडीओ ऐकू शकता तो माझ्या सत्याग्रही या युट्युबवर उपलब्ध आहे. माझे व्यक्तिगत कुठेही, कोणाशीही वैर अथवा कुठल्याही व्यक्तिगत स्वरुपाचे भांडण अथवा वाद-विवाद नाहीत हे मी नम्रपणे सांगू इच्छित आहे.

माझ्या या विडीओ मधील काही भाग काढून दोन मिनिटांचा अर्धवट व्हिडीओ शिवप्रतिष्ठानच्या धारकरी म्हणवणाऱ्याने त्यांच्या इन्स्टाग्राम व्हॉटसपमार्फत माझे नाव व मोबाईल नंबर टाकुन सोशल माध्यमाद्वोर व्हायरल केलेला आहे. मागील दोन दिवसांपासून रात्रंदिवस क्षणाक्षणाला मला राज्याच्या विविध भागातून माझ्या ९८५०६२२७२२ या मोबाईलवर फोन करुन मला जिवे मारण्याच्या, हातपाय तोडण्याच्या, तुझा लवकरच कार्यक्रम करणार, तुझा पानसरे दाभोळकर करणार. तु जाहिरपणे गुरुजीची माफी माग, घाणेरडी शिवीगाळ करत मला धमक्या देत प्रचंड मानसिक त्रास सुरु आहे. जो दहशतवादाचाच प्रकार आहे. माझा मुलगा तन्मय याला सुध्दा रात्री फोन करुन धमकावले आहे. तसेच माझ्या व्हॉटसपवर आणि मोबाईलवर, फेसबुकवर सुध्दा अनेक गंभीर स्वरुपाच्या धमक्या व शिवीगाळ केल्याचे मेसेज आलेले आहेत. मी माझा फोन कालपासून DND मोडवर ठेवला आहे व वारंवार बंदही ठेवावा लागत आहे. यामुळे माझे कुटुंबीय भयभीत झालेले आहेत. मी माझ्या सामाजीक व राजकिय कामानिमित्ताने तसेच विविध प्रकारच्या कार्यासाठी प्रवास करत असतो राज्यात ठिकठिकाणी जात असतो. माझे जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. कोणत्याही प्रकारे माझा घात/अपघात केला जाऊ शकतो. माझे जिवीतास अगर कुंटुंबास आगामी काळात काही ज्ञात-अज्ञात व्यक्तिकडून धोका अथवा इजा झाल्यास त्याला दहशतवादी व हिंसक वृत्तीचे, धर्मांधता पसरविणारे धार्मिक तेढ निर्माण करणारे सर्वस्वी संभाजी भिडे व त्यांचे शिव प्रतिष्ठानचे धारकरी म्हणवणारे जबाबदार असतील. अन्यथा पोलीस प्रशासनाकडून त्यांचेवर कारवाई न झाल्यास पोलीस प्रशासन सुध्दा जबाबदार असतील 

सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तसेच भारताचे संविधान व तिरंगा ध्वज याबाबत जाहिरपणे तीव्र स्वरुपाची विधाने करुन बदनामी व अवमान केलेले आहे. त्याबाबत अनेक वर्तमान पन व प्रसारमध्यमामध्ये बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. अनेक पुरावे त्कसंबंधी सहज मिळू शकतात. ते महात्मा गांधींना देशाचे शत्रू मानतात व नथुराम गोडसे या खुनी व्यक्तिची भलावण करत जाहिर समर्थन करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची नांवे व आधार घेवून स्वतःच्या हव्या असलेल्या स्वप्नातील हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व धर्म समभावी असलेल्या रयतेचे राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराजांच्या जीवनकार्याचा व त्यांच्या तत्वांचा, विचारांचा अवमान करत असतात. आपल्या सोईने इतिहासाचा अर्थ लावून महापुरुषांना संकुचित व अवमानीत करत असतात त्याच पध्दतीने नवतरुणांमध्ये व समाजात मुस्लिम धर्माविषयी द्वेष पसरवून चुकीची माहिती देऊन त्यांच्या भाव- भावनांचा दुरुपयोग करत धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्ये कायम करत असतात याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. जे काम भारतीय संविधानाच्या विपरित आहे. अशी द्वेषमुलक, हिंसक व धर्मांधता वाढविणारी पाठशाळा व शिबीरे संभाजी भिडे कायम घेत असतात. ज्यामुळे राष्ट्राच्या एकतेला व एकात्मतेला धोका निर्माण करण्याचा तो गंभीर प्रकार आहे. त्या कृती कार्यक्रम व प्रवृत्तीला माझा जबाबदार भारतीय नागरिक म्हणून विरोध आहे. परंतु मील लोकशाही मार्गाने विचारांची लढाई, विचाराने लढत आहे व लढत राहील. मी आजपर्यंत कधीही, कुठेही हिंसेचे किंवा दंगलीचे किंवा दहशतवादाचे समर्थन करत नाही, केले नाही व करणार नाही,

हिंसेचे समर्थन, आपल्या प्रतिपक्षाला अथवा विरोधी विचारांच्या लोकांना आपला कट्टर शत्रु समजणे, सामाजिक अथवा धार्मिक तेढ निर्माण करणे, विविध प्रकारे दहशत माजवणे, गुंडागर्दी करणे, दंगल पसरविणे, कायदा हातात घेणे, न आवडणाऱ्या व्यक्ति किंवा धर्माचा किंवा जातीचा द्वेष करणे याला मी आतंकवाद समजतो. आतंकवादाला जात, धर्म, भाषा, प्रांत किंवा ईश्वर, अल्लाह असे कहीही नसते अशी माझी भावना व समज आहे. स्वधर्म आणि देश रक्षणार्थ काम करतो असे सतत सांगणारे व भासविणारे सहसा धार्मिक वृत्तीचे नसतात परंतु ते धर्माध असतात त्यांना स्वतःचा व इतरांचा धर्म व धर्म तत्वज्ञान माहितच नसते. त्यांना मानवतावादी विचार, सर्व धर्म समभाव आणि लोकशाही मान्यच नसते, त्यांचा मानवी झंडींवर विश्वास असतो. 

कोणतेही असंविधानिक किंवा असंसदीय भाषा वापरलेली नाही. मी संभाजी भिडे यांच्या भारतीय संविधान विरोधी कृती कार्यक्रम व धार्मिक तेढ वाढविणाऱ्या हिंसक, अनैतिहासिक मांडले जाणारे मुद्दे, द्वेषमुलक व भावना भडकावणारी भाषा तसेच धर्मांधता वाढवणाऱ्या विचारांवर माझे मत प्रकट केले आहे. ज्यामध्ये, आक्षेपार्ह असे कुठलेही वक्तव्य केलेले नाही.

भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या आधारे मी वैचारिक व तात्वीक मुद्द्यांवर तसेच विविध घडामोडीवर विश्लेषणात्मक भाष्य करीत असतो. मी स्वतः भारतीय संविधान व संसदीय लोकशाही मानणारा असून माझी त्यावर श्रध्दा आहे. राष्ट्राची एकता व एकात्मता अबाधीत रहावी, राज्यात व देशात सर्व धर्म समभाव जोपासला जावा, लोकशाहीचे संवर्धन व्हावे यासाठी मी संविधान जागर तसेच प्रबोधन करत असतो, ती माझी संविधानाला पुरक असलेली भूमिका आहे.

मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच वारकरी संतांची विचारधारा मानणारा असून, भारतीय समाजाची सर्वांगिण प्रगती व्हावी, समाजात जातीय किंवा धार्मिक तेढ नसावा, समाजात कायम शांतता नांदावी यासाठी मी विविध प्रकारे, विविध माध्यमातुन अनेक वर्षापासून सक्रीय आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Clash Market loss : नागपूर हिंसाचारात तीन दिवसात सुमारे 400 कोटी रुपयांचंCBSE Pattern in SSC Board : 'पॅटर्न' बदलणार, सीबीएसई येणार ; अभ्यासक्रमाच कोणते बदल होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Embed widget