Rishabh Pant and Sanjiv Goenka : ऋषभ पंतच्या 'त्या' चुकीमुळे हरली लखनौ? मालक संजीव गोएंका मैदानात आले अन्..., VIDEO
आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला.

Delhi Capitals vs Lucknow Super Giants : आयपीएल 2025 मधील आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या हंगामातील चौथ्या सामन्यात आशुतोष शर्माने लखनौच्या तोंडचा घास हिरावला. जिथे लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 209 धावांचा मोठा धावसंख्या उभारला होता. तिथे फक्त 7 धावांत 3 विकेट आणि 65 धावांत 5 विकेट गमावलेल्या दिल्लीने आशुतोष शर्माच्या बळावर जोरदार पुनरागमन केले आणि शेवटच्या षटकात फक्त 1 विकेटने सामना जिंकला. या सामन्यानंतर, असे काहीतरी घडले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Bro ! Pant you lost the match here ! Misses the match stumping ! #LSGvsDC #IPL2025 #RishabhPant #starc #NupurSharma #kunalkamra #HarbhajanSingh #NicholasPooran #asutosh pic.twitter.com/BjzoJN0mQM
— fart cat 🐱 smokimg🚬 (@gajendra87pal) March 24, 2025
ऋषभ पंतच्या 'त्या' चुकीमुळे हरली लखनौ?
खरं तर, दिल्लीने 19 षटकांत 9 गडी गमावून 204 धावा केल्या होत्या. संघाला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता होती. आशुतोष शर्मा आणि मोहित शर्मा फलंदाजी करत होते. ऋषभ पंतने शाहबाज अहमदकडे चेंडू दिला. त्यावेळी मोहित स्ट्राईकवर होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऋषभ पंतने स्टंपिंगची संधी गमावली. जर पंतने चेंडू पकडला असता तर मोहित आऊट झाला असता, आणि लखनौ जिंकली असती. पण तसे काही झाले नाही. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाहबाजने एक धाव घेतली आणि आशुतोष शर्माला स्ट्राईक दिला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून आशुतोषने दिल्लीचा सामना जिंकून दिला. या सामन्यात त्याने 31 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 66 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले.
Sanjiv Goenka and Rishabh Pant in a fun chat after the match. pic.twitter.com/qqV9VtufFw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 25, 2025
लखनौ सुपर जायंट्सच्या 'या' पराभवानंतर फ्रँचायझी मालक संजीव गोएंका मैदानावर दिसले. गेल्या हंगामात एलएसजीच्या पराभवानंतर केएल राहुलशी झालेल्या वादात संजीव गोएंका चर्चेत आले होते. मात्र, यावेळी पंत संजीव गोएंका यांना काहीतरी समजावून सांगताना दिसला. यादरम्यान दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर हे पण या चर्चेत होते. या संभाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"Sanjiv Goenka" Owner of Lucknow Super Giants IPL team started questioning Rishabh Pant after losing just one match of their season 2025 .
— CelestiaL (@Askcelestial) March 25, 2025
If you have any suggestion or question just do it in the room. #IPL2025 #LSGvsDC #RishabhPant pic.twitter.com/yIvOJFYh5U
2024 मध्ये केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवानंतर संजीव गोयंका यांनी कर्णधार केएल राहुलवर टीका केली होती. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर, संजीव गोएंका आणि केएल राहुलमध्ये काही ठीक नसल्याची बातमी समोर आली. त्याच वेळी, केएल राहुलनेही या हंगामापूर्वी संघ सोडला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
