एक्स्प्लोर

Nanded Mango Success: 10 हजार रुपयांचा एक आंबा विकतोय नांदेडचा हा तरुण, युपीएससी करणाऱ्या या तरुणानं असं काय केलं?

आता या हंगामात या झाडांना रसाळ फळे आली आहेत. विशेष म्हणजे एका आंब्याची किंमत 10 हजार रुपये असल्यामुळे गावात चांगलंच कुतूहल निर्माण झालंय.

Mango Success Nanded: युपीएससी करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणाची सध्या राज्यभरात मोठी चर्चा आहे. जगातील सर्वात महागडा हा तरुण विकतोय. एका आंब्याची किंमत तब्बल 10 हजार रुपये एवढी आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या मियाझाकी आंब्याच्या लागवडीचा निर्णय आता या तरुणाला रसाळ फळे देत आहे. केवळ 10 रोपांमधून आता या झाडांना 11-12 फळे आली आहेत. नंदकिशोर गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे.  युपीएससीच्या अभ्यासासाठी पुण्यात गेलेल्या नंदकिशोरला कोरोना लॉकडाऊनमध्ये घरी परतावं लागलं. सहज ऑनलाईन सर्च करताना या आंब्याची ओळख झाली आणि त्यांनं दोन वर्षांपूर्वी फिलिपिन्समधून 10रोपं आयात केली. आता या हंगामात या झाडांना रसाळ फळे आली आहेत. विशेष म्हणजे एका आंब्याची किंमत 10 हजार रुपये असल्यामुळे गावात चांगलंच कुतूहल निर्माण झालंय. (Nanded Success Story)

नक्की केलं काय या तरुणानं?

नांदेडच्या भोशी गावातील सुमनबाई गायकवाड यांचं शेत सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. जगातील सर्वात महागड्या आंब्यांची रोपं असणारं शेत म्हणून गावकरी त्यांच्याकडे बघत आहेत. तर या सगळ्याची सुरुवात झाली कृषी प्रदर्शनापासून. 17 मार्च रोजी सुमनताई जिल्ह्यातील कृषी व धान्य महोत्सवात त्यांची खास विणलेली टोपली घेऊन आल्या आणि चमकदार लाल रंगाच्या आंब्यानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. खास चव. अनोखा रंग असलेल्या विदेशी मियाझाकी आंब्याची ही टोपली होती. सुमनताईंचा मुलगा नंदकिशोरच्या कल्पनेतून सुमनताईंनी त्यांच्या शेतात जगप्रसिद्ध मियाझाकी आंब्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

नंदकिशोरच्या करियरला नवं वळण

मराठवाड्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे नंदकिशोरही नांदेडहून पुण्यात स्थलांतरीत झालेला. पण लॉकडाऊन लागलं आणि त्याला त्याचं कोचिंग क्लासला जाणं थांबवावं लागलं. त्यामुळे त्यांनं घरी परतण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन सर्च करत त्यानं त्याचा अभ्यास सुरु ठेवला. एके दिवशी सहज सर्च करत असताना मियाझाकी आंब्याविषयी त्याला माहिती मिळाली. जगातल्या सर्वात महागड्या आणि आलिशान मियाझाकी आंब्याच्या लागवडीची सगळी माहिती त्यानं वाचली. आणि उत्सुकता चाळवली. मग सुरु झालं संशोधन. हा आंबा कुठे पिकतो?आपल्याकडे कोणी लागवड करतं का? या आंब्याची व्यवहार्यता कितपत असेल? सगळी माहिती मिळवली आणि आईसोबत म्हणजेच सुमनताईंना हाताशी घेत फिलिपिन्सवरून 6500 रुपये खर्चून 10 रोपे आयात केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृतानुसार, या झाडांना आता 11-12 आंबे लगडले आहेत. कापणीसाठी, योग्य बाजारभाव कसा मिळेल यासाठी परभणीच्या एका अग्रणी शेतकऱ्याचे त्याने मार्गदर्शन घेतले. त्यामुळे सुमनताईंचे प्रीमियम फळ बाजारात मजबूत कमाई करणारे ठरले आहे. नंदकिशोरच्या प्रयत्नांना यश आल्याने गावात हे फळ लावण्यासाठी अनेक शेतकरी आशेनं पाहू लागलेत.

मियाझाकी आंब्याचे वैशिष्ट्य काय?

लालसर केशरी रंगाचे दिसणारे मियाझाकी आंबे हे जगातील सर्वात महागडे आंबे म्हणून ओळखले जातात. मियाझाकी आंबा नावाचा हे रत्न जपानमध्ये उगम पावलंय आणि आता जगभरात लोकप्रिय झालंय.पण मियाझाकी आंब्याचं खरं वेगळेपण त्याच्या चव आणि पौष्टिकतेत आहे.यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या त्वचेसाठी आणि पेशींना नुकसान होऊ न देण्यासाठी चांगलं असतं. व्हिटॅमिन सी आणि ए इतकं जास्त की, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि पचनही बिघडू देत नाही.

हेही वाचा:

Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget