New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल
New Bank Rules : बँकांनी येत्या 1 एप्रिलपासून नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल बँक खातेधारकांना माहिती असणं आवश्यक आहे.

Bank New Rules मुंबई : एप्रिल महिन्यात बँका नियमांमध्ये विविध बदल करणार आहेत. बँका या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करणार आहे. नव्या नियमांमुळं बचत खाते, क्रेडिट कार्ड आणि एटीएम व्यवहारांवर परिणाम होणार आहे. जर तुम्हाला पहिल्यापासून नियम माहिती असतील तर तुम्ही आर्थिक नुकसानासापासून वाचू शकता. बँकिंगकडून मिळणारा फायदा वाढू शकतो.
1 एप्रिलपासून कोणते नियम बदलणार?
एटीएममधून पैसे काढण्याबाबत नवं धोरण
आता एटीएमधून मोफत पैसे काढण्याच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. काही बँकांनी आपल्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदले आहेत. दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून मोफत पैसे काढण्याची संख्या कमी करण्यात आली आहे. ग्राहक केवळ तीन वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएम सेंटरमधून मोफत पैसे काढू शकतात. यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25 टक्के शुल्क द्यावं लागेल.
डिजिटल बँकिंगमध्ये नवे फीचर्स
डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँका सातत्यानं नव्या सुविधा आणत आहेत. ग्राहकांना ऑनलाईन बँकिंद्वारे चांगल्या सेवा दिल्या जातील. याशिवाय बँका एआयद्वारे चालणारे चॅटबॉट आणणार आहेत. यामुळं ग्राहकांना मदत होईल. डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेनटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन या सारख्या सुविधा मजबूत केल्या जाणार आहेत.
किमान शिल्लक रक्कम नियमात बदल
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी किमान शिल्लक रकमेसंदर्भातील नियम बदलले आहेत. आता शिल्लक रक्कम किती असावी यासंदर्भातील निकष बँक खातं कोणत्या ठिकाणी आहे यावर ठरतील. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील शाखेतील खातं यावर अवलंबून असेल. किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक खात्यात राहिल्यास दंड द्यावा लागतो.
चेक संदर्भातील नियम बदलणार
देवाण घेवाणीसंदर्भातील नियम बदलण्यासाठी बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. त्यानुसार आता 5000 पेक्षा अधिक रकमेच्या चेकचा नंबर, तारीख आणि ज्याच्या नावे चेक देत आहोत त्याचं नाव आणि रक्कम बँकांना अगोदरच सांगावं लागेल. त्यामुळं फसवणूक आणि चुका टाळता येतील.
बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याज दरात बदल
काही बँका बचत खाते आणि मुदत ठेव खात्यांच्या नियमात बदल करणार आहेत. बचत खात्याचं व्याज शिल्लक रकमेवर अवलंबून असेल. जितकी अधिक शिल्लक रक्कम तितका अधिक परतावा मिळेल. याचा उद्देश ग्राहकांना अधिक व्याज देऊन त्यांची बचत वाढवण्याचा आहे.
क्रेडिट कार्डच्या फायद्यांमध्ये बदल
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यासह इतर मोठ्या बँका त्यांच्या को ब्रँड विस्तारा क्रेडिट कार्डसच्या फायद्यांमध्ये बदल होणार आहेत. आता या कार्ड्सवर मिळणाऱ्या टिकर व्हाऊचर, रिन्यूअलवर मिळणार फायदे, माइलस्टोन रिवॉर्डस सारखे फायदे बंद केले जाणार आहेत. अॅक्सिस बँक त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्ड्सचे फयदे 18 एप्रिलपासून बदलणार आहेत.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
