एक्स्प्लोर

खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप

लोकसभेला यांनी खूप पैसा वाटला मात्र तरीदेखील लोकांनी यांना स्वीकाराले नाही. आता विधानसभेला 50 कोटी वाटतील असं वाटतंय , असे रोहित पवार म्हणाले.

 पुणे: खेडमध्ये जप्त केलेली पाच  कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. आमदार रोहित पवारांकडून (Rohit Pawar)  पैशांचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.    पुण्याजवळ पकडलेल्या रक्कमेचा हा व्हिडीओ असल्याचा दावा  सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा आल्याचा आरोप आमदार  रोहित पवारांनी केला आहे.  हे पैसे आमदार  शहाजी बापू पाटील यांची असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार असल्याचे देखील ते म्हणाले. 

रोहित पवार म्हणाले, शहाजी पाटील यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे. एकूण पाच  गाड्या होत्या. 25 कोटी रुपये होते अशी माहिती आहे. लोकसभेला यांनी खूप पैसा वाटला मात्र तरीदेखील लोकांनी यांना स्वीकाराले नाही. आता विधानसभेला 50 कोटी वाटतील असं वाटतंय . जो मलिदा त्यांना मिळालाय तो वाटत आहे . मुंबईतून हा पैसा जात होता. पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता त्याला बाधणार नाही.

जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर : रोहित पवार

अनेक पदाधिकारी अजित पवारांच्या पक्षातील नाराज आहेत. अनेक जण आमच्या सोबत येत आहेत. जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होईल . चर्चा सकारात्मक झाली आहे. जागेच्या वादाचा जो आकडा येतोय तो कमी आहे, असे रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवार काय म्हणाले आपल्य ट्वीटमध्ये?

सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला  कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे.  कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!

हे ही वाचा :

 काकाविरुद्ध पुतणी इरेला पेटली, राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात येताच पुतणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोपTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaDhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखलMVA Seat Sharing : मविआ जागावाटप सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या  भेटीसाठी कोण कोण आलं? 
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आलं? 
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू; निलेश लंकेंच्या पत्नीसह 3 जणांनी घेतला अर्ज
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू; निलेश लंकेंच्या पत्नीसह 3 जणांनी घेतला अर्ज
5 crore seized : खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
राधानगरीत रंगत, के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
Embed widget