(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सकाळी 7 पासून मंत्रालयात मलिदा कमवायचे काम करत होते..', युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप
अजित पवारांनी वेदांत फस्कॉन महाराष्ट्रात आणून दाखवावं असं चॅलेंज करत नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलय असं ते म्हणाले.
Mehbub Sheikh on Ajit Pawar: महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे मंत्री सकाळी 7 पासून मंत्रालयात मलिदा कमवायचे काम करत होते, अशा गद्दारांना लोकसभेची निवडणूक व्याज होती, मुद्दल विधानसभा आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehbub Sheikh) यांनी अजित पवारांसह(Ajit Pawar) सरकारवर गंभीर टीका केली आहे.
अजित पवारांनी वेदांत फस्कॉन महाराष्ट्रात आणून दाखवावं असं चॅलेंज करत नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलय असं ते म्हणाले. दिंडोरी ते लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आता नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत.
मेहबूब शेख यांचे अजित पवारांवर गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अजित पवारांसह सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे मंत्री सकाळी 7 पासून मंत्रालयात मलिदा कमवायचे काम करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. गद्दारांना धडा शिकवणारी लोकसभेची निवडणूक ही व्याज होती. मुद्दल विधानसभा निवडणूक असणार आहे. लोकसभा तो झाकी हे विधानसभा बाकी है असं म्हणत मेहबूब शेख यांनी सरकारवर कडाडून टीका केलीय.
देवेंद्र फडणवीसांना 'त्या' मुद्द्यावर विधानसभा लढवायचीय
आज नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह जयंत पाटील आगामी विधानसभा निवडणुकांची चाचपणी करण्यासाठी येणार असून मेहबूब शेख यांनी या पार्श्वभूमीवर सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा- ओबीसी,हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही त्या मुद्द्यांवरच त्यांना लढवायची असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला.
अजित पवारांना मेहबूब शेख यांचे चॅलेंज
सकाळी सात पासून मंत्रालयात मलिदा कमवायचे काम करत असल्याचा आरोप केल्यानंतर अजित पवारांनी वेदांत फस्कॉन महाराष्ट्रात आणून दाखवावा असं चॅलेंज मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केलंय. अजित पवारांनी वेदांत फस्कॉन महाराष्ट्रात आणून दाखवावं,युवक राष्ट्रवादी तुमचा जाहीर नागरी सत्कार करायला तयार आहे असेही मेहबूब शेख म्हणाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) कुणी लोकप्रतिनिधी दिंडोरीत राहिलेला नव्हता. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादी शरद पवार गटाने भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) या शिक्षकाला मैदानात उतरवले. भास्कर भगरे यांनी भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांना पराभूत केल्याने ते जायंट किलर ठरले. आता शरद पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर दोन दिवसातच जयंत पाटील नाशिकमध्ये येणार असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे तुम्ही दाखून दिल दिंडोरीत सर्वसामान्यांनी भगरेंना निवडून दिले आणि भास्कर भगरे सर हे खासदार झाले असेही मेहबूब शेख यांनी सुनावले.