Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे
राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिपदांचा फॉर्म्युला आणि खात्यांच्या वाटप, यासाठी महायुतीतील नेत्यांना आणि पक्षांना तारेवरती कसरत करावी लागणार आहे. याआधी देखील मंत्रीपदासाठी आस लावून बसलेल्या नेत्यांचा देखील विचार यावेळी करावा लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला 23, शिंदेंच्या शिवसेनेला 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 9 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याला हवी त्या खात्यांसाठी पक्षांमध्ये सुरूवातीपासून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पुन्हा यामध्ये लक्ष घालणार का अशा चर्चा देखील सुरू आहेत. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा होणार असल्याचंही बोललं जात आहे. (Maharashtra cabinet expansion)