एक्स्प्लोर

Mahesh Sawant : बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला, त्या सरवणकरांचा माज उतरवला, महेश सावंतांचा हल्लाबोल

Mahesh Sawant : बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला.

Mahesh Sawant, सिंधुदुर्ग : बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला,असे मत माहीम मतदारसंघाचे नवनिर्वाचित उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray Group) आमदार महेश सावंत (Mahesh Sawant) यांनी व्यक्त केले. तर राज ठाकरेंचे आव्हान आम्ही मानतच नव्हतो,असा दावाही महेश सावंत यांनी केला. ते सावंतवाडीत (Sawantwadi) पत्रकारांशी बोलत होते. 

दोन वर्षांपूर्वी माझ्यावर फायरिंग देखील केली होती

महेश सावंत म्हणाले, मी सदा सरवणकरांच्या मुलाविरुद्ध सुद्धा अपक्ष लढलो होतो. त्यावेळेस सुद्धा पावणे दोनशे मतांनी पडलो होतो. त्यावेळी ते सेनेच्या तिकिटावर होते, मी अपक्ष होतो. परंतु तो हिशोब शिल्लक होता. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, सदा सरवणकर माझे प्रतिस्पर्धी म्हणून समोर आल्यानंतर सुद्धा मी लढलो. त्यांनी दोन वर्षांपूर्वी माझ्यावर फायरिंग देखील केली होती. पण आम्ही बाळासाहेबांना वचन दिलं होतं की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही माहीमवर भगवा फडकवणार आहोत. 

 गद्दारीचा शाप माहीमवर लागला होता, तो आम्ही पुसून टाकला 

पुढे बोलताना सावंत म्हणाले, आम्ही माहीमवर भगवा फडकवण्याची वाट पाहात होतो. माहीममध्ये सिद्धीविनायक आहे, प्रभादेवी माता आहे. सगळ्या जाती धर्माचे देवस्थान आहेत. गद्दारीचा शाप माहीमवर लागला होता. तो आम्ही शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला. राज ठाकरेंचं आव्हान आम्ही विचारात घेतलं नव्हतं.

माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला होता. या निवडणुकीत महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केलाय. विशेष म्हणजे या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, अमित ठाकरे हे निवडणुकीला उभे राहिल्याने मतदानाचे विभाजन झाले आणि याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवाराला झाला. महेश सावंत 1300 मतांनी निवडून आले. त्यामुळे राज ठाकरेंसह सदा सरवणकरांनाही या निवडणुकीत मोठा फटका बसलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानंSharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Embed widget