एक्स्प्लोर

Beed Jail Walmik Karad: ज्याला अख्खं बीड थरथर कापायचं त्या वाल्मिक कराडच्या अंगावर हात टाकणारे 'ते' दोघे कोण?

Beed Crime Jail Gang war: गिते गँगने जेलमध्ये वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला घेरलं, तुंबळ हाणामारी, बीड जिल्हा कारागृहात नेमकं काय घडलं? महादेव गितेने वाल्मिकच्या अंगावर हात टाकला

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी तुरुंगात नेहमीप्रमाणे बंदी उठवण्यात आली होती. सकाळी नाश्ताच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते. त्यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जाते. त्याचा राग या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी वाल्मिक कराडला मारहाण केली असावी, अशी शक्यता भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलून दाखवली. वाल्मिक कराड याने अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता धस यांनी व्यक्त केली.

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात आणल्यापासूनच याठिकाणी काहीतरी अघटित होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. अखेर ही शक्यता खरी ठरली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तातडीने अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवले जाण्याची शक्यता आहे. तुरुंग प्रशासनाने वाल्मिक कराड याला मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. या घटनेनंतर बीड जिल्हा तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी

परळीतील आरोपींमध्ये हा वाद झाल्याची पुष्टी जेल प्रशासनाने पुष्टी दिली आहे. फोन लावण्यावरुन हा वाद झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गेल्या दीड-दोन तासांपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी याची चौकशी करत आहेत. या चौकशीतून काय समोर येणार, हे बघावे लागेल. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड कारागृहात वाल्मिक कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. त्याला स्वतंत्र जेवण आणि फोनची सेवा पुरवण्यात आल्याचे धस यांनी म्हटले.

आणखी वाचा

गिते गँगने जेलमध्ये वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला घेरलं, तुंबळ हाणामारी, बीड जिल्हा कारागृहात नेमकं काय घडलं?

बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, सुरेश धस यांचा दावा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Crime News: फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
फार्मा कंपनीचा झोनल मॅनेजर ठरला सायबर ब्लॅकमेलिंगचा बळी, मॉर्फ फोटो व्हायरलची धमकी देत घातला गंडा, उच्चशिक्षिताने संपवलं जीवन
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Pimpri Chinchwad Crime : आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ
आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
Embed widget