Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर स्विफ्ट-बाईकची जोरदार धडक, चार जणांचा मृत्यू
Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. उंबरकोन फाट्याजवळ बाईक आणि स्विफ्ट कारची धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Nashik News नाशिक : घोटी-सिन्नर महामार्गावर (Ghoti Sinnar Highway) भीषण अपघाताची घटना घडली आहे. उंबरकोन फाट्याजवळ बाईक आणि स्विफ्ट कारची धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ मोटारसायकल आणि स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Hospital) दाखल करण्यात आले आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस (Ghoti Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. मृत आणि जखमी व्यक्तींची नावे अद्याप समजलेली नाहीत. मृतांची ओळख पटविण्याचे पोलिसांकडून सुरु आहे.
घोटी सिन्नर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने घोटी - सिन्नर महामार्ग हा एक महत्वाचा रस्ता आहे. हा महामार्ग भाविक व पर्यटकांचा वर्दळीचा मार्ग आहे. शिर्डी, भंडारदरा व गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा सोईचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. हा रस्ता सोईचा असला तरी प्रवासासाठी मात्र धोकादायक ठरत आहे. दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एकलहरे रोडवर अपघात, एक ठार
बुधवारी पहाटे एकलहरे रोडवर गवळी बाबा मंदिर जवळ झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एकलहरेकडे भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 सीसी 9632) रस्त्याच्या बाजूला असेलल्या निलगिरीच्या झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात रोहित राजेंद्र रणशूर (34) वर्षे, मोहिते गॅरेज मागे, अरिंगळे मळा, नाशिकरोड येथील तरुण मृत झाला असून इतर तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : नाशकात राज ठाकरेंचा ताफा तब्बल 15 मिनिटं रस्त्यावरच थांबला, नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
